November 15, 2024 1:50 PM

views 49

७ हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदीची मल्लिकार्जून खर्गे यांची घोषणा

महाविकास आघाडी सरकार ७ हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करेल, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं आहे. पुण्यात काल वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

November 15, 2024 6:59 PM

views 34

मनसे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित केला. जाहिरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा, दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या...

November 15, 2024 7:35 PM

views 44

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण हटवेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व...

November 15, 2024 1:52 PM

views 51

सत्तेत आल्यावर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं शरद पवार यांचं आश्वासन

सत्ता आपल्याला मिळाली तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू आणि त्यांच्या मालाला योग्य किंमत देऊ, असं आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुणे इथल्या मविआ उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत दिलं. राज्यातल्या महिलांना सुरक्षितता मिळवून देणं, शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखणं, तरुणांना रोजगार मि...

November 15, 2024 12:10 PM

views 38

देशाची निर्यात एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये 7.28 टक्क्यांनी वाढून 468 अब्ज 27 दशलक्ष डॉलरवर पोहोचली आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारताच्या निर्यातीत 7 पूर्णांक 28 टक्क्यांनी वाढ झाली असून 468 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात झाली आहे, 2023 मध्ये याच कालावधीत भारताची निर्यात 436 बिलियन डॉलर्स इतकी होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, व्यापारी मालाची निर्यात 252 ब...

November 15, 2024 12:03 PM

views 40

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना, विशेषत: शीख समुदायाला राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात शुभेच्छा दिल्या. गुरु नानकजी यांची प्रेम, विश्वास, सत्य आणि त्यागाची शिकवण सर्वांना नैतिकतेबद्दल ...

November 15, 2024 1:39 PM

views 12

वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून ऑनलाईन

दिल्ली एनसीआर भागातल्या हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर स्थितीत असून आज सकाळचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४२० इतक्या अतिगंभीर स्थितीत होता. पुढचे दोन दिवस त्यात धुक्याची भर पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे नवी दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून पुढचे आदेश ...

November 15, 2024 2:24 PM

views 39

जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जमुई इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने ६ हजार ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पीएम-जनमन योजनेअंतर्गत बांधलेल्या ११ हजार घरांचा गृहप्रवेशही त्यांनी यावेळी केला. तसंच, त्यांनी भगवा...

November 15, 2024 11:35 AM

views 54

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज संध्याकाळी जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावार खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ नं आघाडीवर आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता हा सामना सुरू होईल.  

November 15, 2024 11:06 AM

views 56

पुण्यात पाचवी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू

पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात पाचवी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू आहेत. काल दुसऱ्या दिवसाखेर १० मीटर एअर पिस्टल एच एस १ महिला गटाच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या भक्ती शर्मा हिने सुवर्ण पदक पटकावले; तर राजस्थानच्या श्रृष्ठी असोरानं रौप्य पदक पटकावला. पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ...