November 19, 2024 1:42 PM

views 47

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरियो इथे जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान त्यांचे चिनीचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अलिकडेच विस्कळीत झालेल्या भारत-चीन सीमेवरच्या प्रगतीविषयी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या पुढच...

November 19, 2024 1:32 PM

views 37

उद्या झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार असून त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी राज्यभरात एकूण १४ हजार २१८ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. केंद्रीय निमलष्करी दल...

November 19, 2024 1:27 PM

views 37

मतदानाचं प्रमाण वाढण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत ६३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ पूर्णांक १ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ पूर्णांक ३३ शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा ...

November 19, 2024 1:29 PM

views 32

राज्यात २८८ मतदार संघांमध्ये १५८ पक्षांकडून २,०५० उमेदवार रिंगणात, उर्वरित २,०८६ अपक्ष

राज्यातल्या २८८ मतदार संघांमध्ये १५८ पक्षांकडून २ हजार ५० उमेदवार रिंगणात आहे. उर्वरित २ हजार ८६ अपक्ष आहेत. सर्वाधिक २३७ उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे २०० उमेदवार रिंगणात आहेत. भाजपानं १४९, मनसेनं सव्वाशे, काँग्रेसनं १०१ उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. उद्धव ठाकरे ...

November 19, 2024 1:47 PM

views 36

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४,१३६ उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि २ तृतीयपंथी आहेत.    बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी १७ उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. उत्...

November 19, 2024 8:14 PM

views 46

जी-२० बैठकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रिओ द जानेरो इथं जी-20 परिषदेच्या निमित्तानं, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ ईनाचिओ लुलादा सिल्व्हा यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, जैव इंधन, संरक्षण, आणि कृषी इत्यादी विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यात सुधारणा करण्याबाबत कटीबद्धता व्यक्त केली. भारत आणि ब...

November 19, 2024 12:39 PM

views 41

यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने येत्या २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यन लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांकडून पाठिंबा मागणार आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

November 19, 2024 9:46 AM

views 36

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्य सामना आज जपानबरोबर

बिहारमधील राजगीर इथं सुरु असलेल्या आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत साखळीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघानं जपानवर ३-० अशी मात केली. या स्पर्धेतील उपांत्य फारीचा सामना आज याच जपान संघाबरोबर खेळला जाणार आहे. दिपिकानं या स्पर्धेत सर्वाधिक गोल केले असून कालच्या सामन्यातही तीनं २ गोल नोंदवले तर उपक...

November 19, 2024 9:39 AM

views 48

दिल्ली प्रदुषणाच्या पार्श्वभुमीवर शेजारील राज्यांनी प्रदुषण नियंत्रणासंदर्भात निर्बंध लागू करावेत – सर्वोच्च न्यायालय

राजधानी दिल्ली क्षेत्रातली हवेची गुणवत्ता आणखी घसरली असून आज सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 494 अंकांवर गेला होता. केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार काही भागात हा निर्देशांक 500 नोंदवला गेला. यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, राजधानी क्षेत्रातली प्रदूषणा...

November 19, 2024 9:31 AM

views 29

मणिपूरमध्ये CAPFच्या ५० अतिरिक्त तुकड्या तैनात करणार

मणिपूरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल विविध स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर उच्च स्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्रिय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPFच्या ५०अतिरिक्त तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली. राज्यात शांतता आ...