November 19, 2024 7:47 PM

views 46

महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल

महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघानं आज प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारतानं जपानवर २-० अशी मात केली. अंतिम फेरीत भारताची गाठ चीनशी पडेल. उपांत्य फेरीत चीननं मलेशियाला ३-१ असं नमवलं. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या संध्याकाळी बिहारमध्ये राजगीर हॉकी मैदानावर पावणेपाच वाजता ...

November 19, 2024 6:51 PM

views 43

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी रवाना

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी रवाना झाले आहेत.  नागपूरमध्ये सर्व मतदान केंद्रावर कर्मचारी आणि सुरक्षा बलं पोहोचली आहेत. भंडाऱ्यात एसटी महामंडळान १३४ बस दिल्या आहेत. ५ हजार २३६ निवडणूक कर्मचारी आणि १४०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. गोंदियात बाराशे ८५ मतदान केंद्रावर...

November 19, 2024 6:45 PM

views 48

मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ पूर्णांक १ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ पूर्णांक ३३ शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा...

November 19, 2024 3:44 PM

views 36

महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेतून भारताची आघाडीची फलंदाज शफाली वर्मा हिला वगळलं आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. स्मृती मंधना ही उप कर्णधार आहे. वेगवान गोलंदाज हरलीन देओल दुखापतीतूून सावरली असून संघात परतली आहे,...

November 19, 2024 3:24 PM

views 53

शिवसेनेच्या जयंत साठे या नेत्याच्या कक्षातून १ कोटी ९८ लाख रुपये रोकड जप्त

नाशिक शहरातल्या पाथर्डी फाटा इथल्या एका तारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या जयंत साठे या नेत्याच्या कक्षातून १ कोटी ९८ लाख रुपये इतकी रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी आयोगाने सुरू केली असून ही रक्कम आपल्या व्यवसायासाठीची असल्याची प्रतिक्रिया साठे यांनी दिली.

November 19, 2024 3:21 PM

views 37

उद्या होणाऱ्या मतदानाकरता मतदान यंत्र मतदान केंद्रावर रवाना

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली असून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.      नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी पोहोचले आहेत. सर्व केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र दल आणि पोलीस तैनात...

November 19, 2024 3:17 PM

views 40

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप

पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. तावडे कथितरित्या पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. बविआ कार्यकर्त्यांना असाच गैरसमज झाला आहे. तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हा...

November 19, 2024 2:56 PM

views 44

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना हवामान बदल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यासाठी जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि सल्लागार...

November 19, 2024 2:51 PM

views 45

सुदानमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या ठरावावर रशियाचा नकार

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुदानमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या ठरावावर रशियानं व्हेटो अर्थात नकाराधिकार वापरला आहे. या परिषदेतील १५ सदस्य राष्ट्रांपैकी या निर्णयाविरोधात व्हेटो वापरणारा रशिया हा एकमेव देश आहे.

November 19, 2024 2:47 PM

views 33

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून गोव्यात

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात ८१ देशांमधले एकूण १८० चित्रपट प्रदर्शित केले जातील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल वार्ताहर परिषदेत या महोत्सवाच्य़ा आयोजनाबाबत माहिती दिली. महोत्सवस्थळी जाण्यासाठी विनाशुल्क वाहन व्यवस्था तसंच...