November 21, 2024 1:14 PM

views 36

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्क्यांहून अधिक मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. नाला मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुम मध्ये ठेवली असून तिथे सीसीटीव्हीसह त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली.

November 20, 2024 6:49 PM

views 40

बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं निधन

बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.  सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात एका मतदाराचा मतदान करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तसंच डांगेघर मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला.  बीड जिल्ह्यात परळी म...

November 20, 2024 6:46 PM

views 50

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झालं तरी मर्यादित ठिकाणी गैरवापर झाले. त निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली.  नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना आज सकाळी जीवे मा...

November 20, 2024 6:43 PM

views 31

विधानसभेसाठी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध क्षेत्रातील नामवंतांनी मतदानाचा हक्क बजावला

विधानसभेसाठी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध क्षेत्रातील नामवंतांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ...

November 20, 2024 6:41 PM

views 17

चीनला १-० ने नमवून आशियाई हॉकीचं अजिंक्यपद भारतीय महिला संघाला

बिहारच्या राजगीर इथे आज झालेल्या महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाने चीनचा १ -० असा पराभव केला. सामन्याचं मध्यांतर होईपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. मध्यंतरानंतर भारताच्या दीपिकाने गोल करत खातं उघडलं आणि तोच भारतासाठी निर्णायक गोल ठ...

November 20, 2024 6:32 PM

views 27

निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे वाटल्याचा भाजपाचा आरोप

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे वाटल्याचा आरोप भाजपाने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा यात हात असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते सांबित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रक...

November 20, 2024 6:43 PM

views 41

इफ्फी महोत्सवाला महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात

५५वा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. संध्याकाळी उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचा मूकपटापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास दर्शवणारा कार्यक्रम सादर होईल. ८१ देशातले १८० चित्रपट हे महोत्सवाचं आकर्षण असून  ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्द...

November 20, 2024 1:35 PM

views 63

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८ पूर्णांक १४ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक ३० टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं. सर्वात कमी मतदान नांदेडमध्ये १३ पूर्णांक ६७ शतांश टक्के झालं.    गोंदिया, चंद्रपूर, धुळे, जालना, कोल्हापूर, नंदूरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मतदानाचं प्रम...

November 20, 2024 1:50 PM

views 40

राज्यात विविध लक्षवेधी मतदान केंद्र

राज्यात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यात महिला विशेष, युवक विशेष, दिव्यांग विशेष, हरित अशा विविध प्रकारची मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.   राज्यातली पहिल्या क्रमांकाची मतदार रविता पंकज तडवी हिनं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रथम ...

November 20, 2024 8:30 AM

views 47

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी देखील आज मतदान होत असून या पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.   झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील आज मतदान होत असून या टप्प्यात १२ जिल्ह्यांमधल्या ३८ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली...