November 22, 2024 3:38 PM

views 46

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक

मंगळूर विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या राज तिवारी या खेळाडूनं उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं. तिवारीनं ३० मिनिटं ५९ सेकंद वेळ देत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं. मुंबई विद्यापीठानं क्रॉसकंट्री स्पर्धेत पहिल्यांदाच वैयक्तित गटात सुवर्ण पद...

November 22, 2024 3:25 PM

views 63

ईव्हीएम अथवा स्ट्राँग रूमबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये – निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे

मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षाकवच देण्यात आलं असून, शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ईव्हीएम अथवा स्ट्राँग रूमबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये, असं निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितलं. चिपळूणमध्ये मतदानयंत्रात छेडछाड करण...

November 22, 2024 3:10 PM

views 37

श्रीलंकेत सत्ताधारी पक्षातल्या २९ जणांची उपमंत्री म्हणून नियुक्ती

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी सत्ताधारी पक्षातल्या २९ जणांची आज उपमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या सोमवारी राष्ट्रपतींनी २१ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली होती. श्रीलंकेचं आताचं मंत्रिमंडळ गेल्या काही दशकातलं सर्वात लहान आकाराचं मंत्रिमंडळ आहे. आतापर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र...

November 22, 2024 3:06 PM

views 61

दिल्ली-एनसीआर परिसरात प्रदूषणाची पातळी ढासळली

दिल्ली-एनसीआर परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी ढासळली आहे. आज सकाळी सात वाजता या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३७१ म्हणजे अधिक खराब नोंदवला. तर काही ठिकाणी हा निर्देशांक ४०० पेक्षा अधिक होता. दिल्लीतील जहांगीरपुरी इथं ४२६, आनंद विहार इथं ४१०, रोहिणी इथं ३९७ आणि चांदणी चौकात ३५९ इ...

November 22, 2024 3:29 PM

views 40

८२ युवा कलाकारांचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने सन्मान

२०२२ आणि २०२३ या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार आज नवी दिल्लीत सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणिश चावला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळालेल्यांत अनुजा झोकरकर, सारंग कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांचा समावेश आहे. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आदिवासी कला आणि कठपुतळी नृत्य क...

November 22, 2024 2:48 PM

views 20

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने काढलेल्या वॉरंटचा जो बायडन यांच्याकडून निषेध

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक इस्रायली नेत्यांच्या अटकेसाठी काढलेल्या वॉरंटचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केला आहे. आयसीसीची ही कृती इस्रायलच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजिबात न्याय्य नाही. इस्रायलला असलेल्य...

November 22, 2024 2:44 PM

views 50

विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे, यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. त्या आज हैद्राबाद इथं लोक मंथन कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत बोलत होत्या. राष्ट्रपतींनी यावेळी आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचं औपचारिक उदघाटन क...

November 22, 2024 1:28 PM

views 33

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची घेतली भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लाओसमध्ये व्हिएन्तियान इथे जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची भेट घेतली. निकातानी यांच्यासोबत या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो-पॅसिफिक प्रदेशातल्या मुक्त भागिदारीविषयी चर्चा झाल्याचं सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. त्यानंतर सिंग यांनी फिलि...

November 22, 2024 1:23 PM

views 33

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले आहेत. गेल्या दशकभरात झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं. गयानात जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्...

November 22, 2024 1:03 PM

views 47

काँग्रेसने मणिपूरमधली परिस्थिती संवेदनशील केल्याचा भाजपचा आरोप

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर मणिपूरमधली परिस्थिती जाणीवपूर्वक संवेदनशील केल्याचा आरोप केला आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्राला नड्डा यांनी उत्तर दिलं आहे. मणिपूरमधली शांतता भंग करण्यासाठी कट्टरतावादी ...