November 26, 2024 7:22 PM

views 52

पाकिस्तान इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची गृहमंत्रालयाची घोषणा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं तेहरीक ए इन्साफ पक्षाचे समर्थक आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत सहा जवानांचा मृत्यू झाल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची घोषणा आज गृहमंत्रालयाने केली. आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसंच आवश्यकत...

November 26, 2024 7:20 PM

views 40

केंद्र सरकार ग्रामीण भागात १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारणार

केंद्र सरकारच्या सहकार से समृद्धी या योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारले जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड तसचं राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम असून तो राज्यातल्य प्रत्येक जिल्ह्यात राबवला जा...

November 26, 2024 7:17 PM

views 32

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या भुयारी मार्गावर व्हेंटिलेशन प्रणाली बसवली जाणार

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशन प्रणाली बसवली जाणार आहे. यात ९ जेट पंखे आणि अधिक क्षमतेचे मध्यवर्ती पंके बसवले जाणार आहेत. या प्रणालीची मदत आगीसारख्या घटना घडल्यावरही होणार आहे. भुयारात आग लागल्यावर मध्यवर्ती पंखे अधिक वेगानं फिरतील आण...

November 26, 2024 7:15 PM

views 48

मुंबईत, लोअर परळ परिसरातल्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबईत, लोअर परळ परिसरातल्या १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम २८ नोव्हेंबर रात्री दहा वाजल्यापासून ते २९ नोव्हेंबर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातल्या लोअर परळ, करीरोड, प्रभादेवी, सेनापती बापट मार्ग या ...

November 26, 2024 8:02 PM

views 39

महाराष्ट्रात सरकारस्थापनेची अद्याप प्रतिक्षा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे, मंत्री ...

November 26, 2024 7:55 PM

views 45

राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यसभेतल्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. यात आंध्र प्रदेशातल्या ३, तर ओदिशा, पश्चिम बंगाल, आणि हरियाणातल्या एका जागेचा समावेश आहे. आंध्रप्रदेशातले खासदार वेंकटरमण राव मोपीदेवी, बीडा मस्तान राव यादव, आणि ऋयागा  कृष्णय्या यांनी राजीनामे दिले. तसंच ओदिशातले सु...

November 26, 2024 4:24 PM

views 30

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ज्येष्ठ शाहीर आणि लोककलेचे अभ्यासक मधुकर नेराळे यांचं निधन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ज्येष्ठ शाहीर आणि लोककलेचे अभ्यासक मधुकर नेराळे यांचं काल मुंबईत लालबाग इथल्या राहत्या घरी निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.    लालबाग इथल्या प्रसिद्ध हनुमान तमाशा थिएटरचे मालक असलेल्या नेराळे यांच...

November 26, 2024 3:04 PM

views 50

अंदमानजवळच्या समुद्रात मच्छिमार बोटीत भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने काल अंदमानजवळच्या समुद्रात एका मच्छिमार बोटीतून अवैध अंमली पदार्थ पकडले. भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानांनी आपल्या नियमित गस्तीदरम्यान या बोटीच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. ही बोट समुद्राच्या भारतीय हद्दीत बॅरन बेटाजवळ असताना संयुक्त कृती दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीवर जाऊ...

November 26, 2024 2:47 PM

views 17

प्रसिद्ध उद्योजक शशिकांत रुईया यांचं निधन

प्रसिद्ध उद्योजक आणि एस्सार उद्योगसमूहाचे सह संस्थापक शशिकांत रुइया यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. दीर्घ आजारावर अमेरिकेत उपचार घेऊन ते महिनाभरापूर्वीच मुंबईत परतले होते. १९६९मधे त्यांनी आणि रवि रुइयांनी एस्सार उद्योगसमूहाची स्थापना केली. तेल, वायू उत्खनन तसं...

November 26, 2024 3:15 PM

views 42

‘येत्या १० वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतियांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दीष्ट’

येत्या दहा वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतियांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दीष्ट आहे, असं गुजराथ सहकारी दूध विपणन संघ म्हणजेच अमूल संघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना मेहता यांनी अमेरिकेनंतर आता युरोप...