December 3, 2024 2:36 PM

views 22

43व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघानं जिंकलं सुवर्णपदक

43व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघानं सुवर्णपदक जिंकत आपलं वर्चस्व अबाधित राखलं आहे. मुलांच्या संघानं या स्पर्धेच्या इतिहासातला 35 वा विजय नोंदवत त्यांचा सलग 19 वा विजय साजरा केला, तर मुलींच्या संघानं सलग दहावं आणि एकूण 26 वं विजेतेपद पटकावलं. मुं...

December 3, 2024 2:33 PM

views 51

पुढच्या तीन दिवसात राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता – हवामान विभाग

फेंगल चक्रिवादळामुळे पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून वातावरण उष्ण आणि ढगाळ राहील अशी शक्यता आहे. या पावसामुळे काजू आणि आं...

December 3, 2024 2:31 PM

views 22

आशियायी इ- क्रीडा स्पर्धांमधल्या इ- फुटबॉल क्रीडा प्रकारात भारताच्या पवन कामपेल्ली यानं पटकावलं कांस्य पदक

थायलंड मधल्या बँकॉक इथं सुरु असलेल्या आशियायी इ- क्रीडा स्पर्धांमधल्या इ- फुटबॉल क्रीडा प्रकारात काल भारताच्या पवन कामपेल्ली यानं कांस्य पदक पटकावलं. या क्रीडास्पर्धांमधलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. पवन कामपेल्ली यानं इंडोनेशियाच्या असगर्द अझिझीवर २-१ अशी मात केली. पवननं गेल्या महिन्यात वेव्ज इ स्पो...

December 3, 2024 2:29 PM

views 30

केरळच्या कण्णूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

केरळच्या कण्णूर आणि कासारगोड जिल्ह्यांमधे आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर केरळात सर्व जिल्हा मुख्यालयांमधे नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत. दरम्यान मुसळधार पावसामुळे केरळच्या उत्तरभागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांची आणि इ...

December 3, 2024 2:25 PM

views 32

प्रधानमंत्र्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून केली चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी तामिळनाडूला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.  

December 3, 2024 2:23 PM

views 34

गिनी देशात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू

गिनी देशात एनझेरेकोर शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार सर्वप्रकारची मदत करत असल्याचं सांगून गिनीचे राष्ट्राध्यक्ष मामाडी डौम्बोया यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. दुर्घटनेची कारणं शोधण्यासाठी प्रधानमंत्री अमादोउ ओर...

December 3, 2024 2:19 PM

views 37

अमेरिकेने युक्रेनसाठी ७२ कोटी ५० लाख डॉलर्सची नवीन लष्करी मदत केली जाहीर

अमेरिकेनं युक्रेनसाठी ७२ कोटी ५० लाख डॉलर्सची नवीन लष्करी मदत जाहीर केली आहे. त्यात भूसुरुंग तसचं हवाई हल्ला प्रतिरोधक शस्त्रांचा समावेश आहे. युक्रेनचा रशियापासून बचाव करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचं परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले. ट्रम्प प्रशासन युक्रेनला मिळणारी लष्करी मदत थांबवण...

December 3, 2024 2:17 PM

views 38

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर त्यांना आदरा...

December 3, 2024 2:14 PM

views 19

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ

मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारनं मनरेगासाठी अर्थसंकल्पात ८७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेम्मसानी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला...

December 3, 2024 7:02 PM

views 27

सुगम्य भारत अभियानाचा आज नववा वर्धापन दिन

दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक वातावरण असलेला भारत निर्माण करण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या सुगम्य भारत अभियानाचा आज नववा वर्धापन दिन आहे. पायाभूत सुविधा, वाहतुकीच्या सोयी आणि सार्वजनिक जागांचा वापर दिव्यांगांना अधिक चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं. तसंच दिव्यांगांच...