December 6, 2024 7:17 PM

views 17

वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा मृत्यू झाल्याची कोणतीही आकडेवारी नाही – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा थेट मृत्यू झाल्याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आज सरकारनं लोकसभेत आज दिली. श्वसनाचे आजार आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारामध्ये प्रदूषण हे महत्त्वाचं कारण असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सभागृहात विचारलेल्या एका...

December 6, 2024 8:16 PM

views 65

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं आज वार्धक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या महिन्यापासून मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. नाशिक इथं खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पिचड यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची स...

December 6, 2024 7:00 PM

views 46

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.    नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दल मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या दीक्षाभूमीतल्या यात्री निवासात  महारक्तदान शिबिराचं  आ...

December 6, 2024 7:41 PM

views 51

विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी

भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉ नीलम गोऱ्हे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. उद्यापासून ९...

December 6, 2024 7:41 PM

views 36

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

वाशीम जिल्ह्यात काही दिवसापासून ढगाळ वातावरण असून आज दुपारी बारा वाजता मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसानं मंगरूळपिर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन भिजलं. सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत असल्यानं कृषी उत्पन्न ...

December 6, 2024 5:07 PM

views 12

पनवेल पालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला प्रारंभ

रायगड जिल्ह्यातल्या पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला आज प्रारंभ झाला. या अभियानात १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातल्या मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येत असून हात स्वच्छ धुण्याचं प्रात्यक्षिकही देण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या १ लाख ५० हजार मुलांना याचा...

December 6, 2024 4:51 PM

views 30

फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धा : डी. गुकेश आणि डिंग लेरेन यांच्यातली नववी फेरीही अनिर्णित

सिंगापूर इथं सुरु असलेल्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली नववी फेरीही अनिर्णित राहिली. दोन्ही बुद्धीबळपटू ५४ चाली खेळल्यानंतर ही फेरी अनिर्णित ठेवण्यावर सहमत झाले. दोघांनाही प्रत्येकी साडेचार गुण मिळाले असून या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्यासाठी दो...

December 6, 2024 3:20 PM

views 41

अमेरिकेत उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का

अमेरिकेत काल उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७ इतकी होती. या धक्क्यानंतर त्सुनामीची चेतावणी दिल्यामुळे किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हम्बोल्ट काऊंटीच्या फेरंडल शहराच्या पश्चिमेला या भूकंपाचं केंद्र होतं असं अमेर...

December 6, 2024 3:16 PM

views 19

फ्रान्सच्या नव्या प्रधानमंत्र्यांच्या नावाची घोषणा लवकरच

फ्रान्सच्या नव्या प्रधानमंत्र्यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी जाहीर केलं आहे. मॅक्रोन यांनी काल संसदेला संबोधित करताना ही माहिती दिली. फ्रान्सचे प्रधानमंत्री मिशेल बार्नियर यांनी संसदेत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानं राजीनामा दिल...

December 6, 2024 3:22 PM

views 16

उद्या देशव्यापी क्षयरोगी निर्मूलन मोहिमेची सुरुवात होणार

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा  उद्या हरयाणातील पंचकुला इथं देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात करतील. देशातल्या ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ३४७ जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम १०० दिवस चालणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी २०१८ मध्ये क्षयरोग निर्मूलन ...