December 8, 2024 10:26 AM

views 47

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही – जे. पी. नड्डा

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल सांगितलं. पंचकुला इथून 100 दिवसांच्या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की 2025 पर्य...

December 8, 2024 10:06 AM

views 50

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शपथग्रहण प्रक्रिया सुरू

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वप्रथम चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या नवनिर्वाचित आमदारांना, तालिका अध्यक्ष म्हणून सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र...

December 8, 2024 8:25 AM

views 40

१९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश संघात अंतिम सामना

दुबई इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतानं उपांत्य सामन्यात श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

December 7, 2024 8:06 PM

views 34

जगात कुठेही भू-राजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात-एस जयशंकर

जगात कुठेही भू-राजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात असं परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. कतारमधे दोहा फोरम २०२४ या चर्चासत्रात संघर्ष समेटाचं नवीन युग या विषयावर ते बोलत होते. भूमध्य सागरी प्रदेशात भारतीय वंशाचे सुमारे ५० हजार लोक राहतात, तर आखाती देशांमधे ही संख...

December 7, 2024 7:54 PM

views 56

मस्कत इथं आजपासून कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धा सुरू

ओमानची राजधानी मस्कत इथं आजपासून कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ - ० असा दणदणीत पराभव केला. भारतीय महिला संघाचा पहिला सामना ज्योती सिंह हिच्या नेतृत्वाखाली उद्या बांगलादेशाच्या संघाबरोबर होणार आहे.    पुढच्या वर्षी चिली देशात होणा...

December 7, 2024 7:46 PM

views 38

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला दहावा सामना अनिर्णित

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला दहावा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही खेळाडू प्रत्येकी पाच गुणांसह बरोबरीत आहेत. या स्पर्धेत लिरेननं पहिला तर गुकेशनं तिसरा गेम जिंकला. इतर सर्व गेममधे बरोबरी झाली आहे. अजून ४ सामने बाकी आहेत.

December 7, 2024 7:42 PM

views 49

आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत दिल्ली पोलिसांकडून एकाला अटक

दिल्ली पोलिसांनी आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत एकाला अटक केली असून दोन किलोहून अधिक उच्च प्रतीचा चरस जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या 'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत गेल्या १५ दिवसांत सुमारे ५५ किलो गांजा, ७ हजार ८०० क्वार्टर अवैध दारू, दोन किलोहून अधिक चरस आ...

December 7, 2024 7:35 PM

views 24

अनंत भालेराव स्मृती पुरस्कार माजी महासंचालक डॉ.मीरा चड्डा बोरवणकर यांना उद्या प्रदान केला जाणार

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या माजी महासंचालक डॉ.मीरा चड्डा बोरवणकर यांना उद्या छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे. रूपये ५०हजार, मानपत्...

December 7, 2024 7:31 PM

views 47

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५ लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड जगातला पहिला संघ ठरला

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड हा जगातला पहिला संघ ठरला आहे. एकूण १ हजार ८२ सामने खेळून आणि ७१७ खेळाडूंच्या  सहभागातून इंग्लंडने हा विक्रम नोंदवला आहे.    इंग्लंड संघाने १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी स...

December 7, 2024 8:28 PM

views 18

महाराष्ट्र विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचं कामकाज स्थगित, ९ तारखेला अध्यक्षांची निवड

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कामकाजाला सुरुवात केली. चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशीष जयस्वाल या तालिका सदस्यांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यां...