December 8, 2024 1:34 PM

views 30

अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नाही – परराष्ट्र व्यवहार मंत्री

अमेरिकेच्या डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चलन सुरु करण्याचा ब्रिक्स देशांचा कोणताही विचार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. ते कतरच्या राजधानीत आयोजित दोहा फोरममध्ये बोलत होते. अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या मुद्द...

December 8, 2024 11:40 AM

views 18

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा चालूच राहणार – अमित देशमुख

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार असल्याचं, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. महापालिका प्रशासनाने महिलांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावीत, अशा सूचना देशमुख यांनी आहे.

December 8, 2024 11:19 AM

views 30

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार – अमित देशमुख

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार असल्याचं, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. महापालिका प्रशासनाने महिलांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावीत, अशा सूचना देशमुख यांनी आहे.

December 8, 2024 11:14 AM

views 35

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं आयोजन

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने कालपासून आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयात पाण्याच्या नळाची सुयोग्य जोडणी, सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा, सुस्थितीत असलेले छत तसंच दरवाजे, स्वच्छता, रंगरंगोटी, या निकषांनुसार उत्कृष्ट शौचालयाची निवड ...

December 8, 2024 11:08 AM

views 42

परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व, कौशल्य विकास, कविता वाचन, कथालेखन, तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या नव संकल्पना इत्यादी विविध प्रकारात स्...

December 8, 2024 11:03 AM

views 229

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी दहा वाजता वर्णी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. १५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवामध्ये कीर्तन, गायन, भजन, वाघ्या- मुरळी आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती, योगेश्वरी देवस्थानच्या विश्...

December 8, 2024 11:00 AM

views 19

अनंत भालेराव प्रतिष्ठानचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार

अनंत भालेराव प्रतिष्ठानचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, निवृत्त पोलिस अधिकारी डॉ.मीरा चढ्ढा बोरवणकर यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. यावे...

December 8, 2024 10:43 AM

views 25

विश्व बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेश आणि डिंग लिरेन दहाव्या फेरीतही बरोबरीत

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश आणि गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील दहावा सामना काल सिंगापूर इथं अनिर्णित राहिला. लिरेन आणि गुकेश प्रत्येकी 5 गुणांवर बरोबरीत आहेत तर अडीच दशलक्ष अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कमेच्या या स्पर्धेतील चार खेळ बाकी आहेत. 14 फेऱ्या...

December 8, 2024 10:36 AM

views 32

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये श्वानपथकाचाही समावेश असेल. यावेळ...

December 8, 2024 10:34 AM

views 37

सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या शूर जवानांच्या शौर्य, निर्धार आणि बलिदानाला सलाम करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. जवानांचं शौर्य आपल्याला प्रेरणा देतं आणि त्यांच्या त्यागापुढं आपण सर्वच नतमस्तक होतो, असं आपल्या संदेशात मोदी यांनी म्हंटलं आहे. सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत य...