December 10, 2024 10:03 AM

views 47

कनिष्ठ महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियावर ५-० असा विजय

ओमानमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक महिलांच्या कनिष्ठ गटातील हॉकी स्पर्धांमध्ये भारतानं मलेशियाचा 5-0 पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली. दीपिकानं भारताकडून तीन गोल केले. भारताचा पुढचा सामना चीनबरोबर होणार आहे. आशिया चषक स्पर्धांमधले पहिले पाच संघ पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक हॉकी स्पर्धांसाठी पात्र ठरणा...

December 10, 2024 1:48 PM

views 12

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं निधन

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं आज पहाटे बेंगळुरू इथे त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि...

December 10, 2024 9:54 AM

views 16

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह आज मॉस्कोमध्ये भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. लष्करी सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांचा दोन्ही मंत्री आढावा घेतील. विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांबाबतही चर्चा होणार आहे. राजनाथसिंह रवि...

December 10, 2024 9:48 AM

views 62

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांकडून प्रलंबित

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांनी प्रलंबित ठेवले आहेत. सिरियात बंडखोरांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर अध्यक्ष बशर-अल-असाद यांनी पलायन केलं; त्यानंतर युरोपीय राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिरियामधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि तिथली राजकीय स्थिती स्...

December 10, 2024 9:41 AM

views 35

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

गेल्या आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी होता, असं महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राज्य विधान मंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये राज्यपालांनी काल विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केलं. सध्याच्या 2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टें...

December 10, 2024 9:30 AM

views 29

नोईडा आंतररराष्ट्रीय विमानतळामुळे दळणवळण वाढेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नोईडा आंतररराष्ट्रीय विमानतळामुळे दळणवळण वाढेल आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे एनसीआर क्षेत्र आणि उत्तर प्रदेशातल्या लोकांचं जीवनमान सुकर होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपलं सरकार जनतेला उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी अनेक पाऊलं उचलत असल्याचं त्यांनी समा...

December 10, 2024 10:48 AM

views 36

पुढच्या तीन वर्षांमध्ये २ लाख विमा सखी नेमण्याचं सरकारचं नियोजन – अर्थमंत्री

पुढच्या तीन वर्षांमध्ये दोन लाख विमा सखी नेमण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पानिपतमध्ये विमा सखी योजनेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. या वर्षी 25 हजार विमा सखी नेमल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत विमा एजंट म्हणून काम करणाऱ्य...

December 10, 2024 9:02 AM

views 45

मानवी हक्क दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संबोधन

आज मानवी हक्क दिन आहे. तत्कालीन संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 1948 मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या घटनेनिमित्त दर वर्षी दहा डिसेंबरला हा दिन साजरा करण्यात येतो. आपले हक्क, आपलं भविष्य, या क्षणी असं यंदाच्या मानवी हक्क दिनाचं ब्रीदवाक्य आहे. या दिनानिमित्त राष्ट्रीय मानवी हक्क आयो...

December 9, 2024 8:10 PM

views 50

सरकारनं गेल्या १० वर्षात महिला सक्षमीकरणासाठी अनेक अभूतपूर्व पावलं उचलली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

आपल्या सरकारनं गेल्या १० वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक अभूतपूर्व पावलं उचलली असून यापुढेही महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते हरियाणामधे पानिपत इथे बीमा सखी योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते. हरियाणानं ज्या पद्धतीनं एक है तो से...

December 9, 2024 8:12 PM

views 44

गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत काँग्रेस, द्रमुकसह अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी लाचखोरी प्रकरणात घोषणाबाजी केली. या दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ वरच्या चर्चेला उत्तर देण्...