December 10, 2024 3:14 PM

views 50

राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचा अविश्वास ठराव

राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने अविश्वास ठराव मांडला आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारुन पक्षपात करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हा प्रस्ताव मांडला असल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. लोकशाहीच्या रक्षणार...

December 10, 2024 1:51 PM

views 40

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवर गदारोळ होऊन आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. सभागृहाच्या सभ्यतेचे पालन केलं जावं,तसंच देशातल्या जनतेच्या आशाआकांक्षांचा आदर...

December 10, 2024 1:32 PM

views 36

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त राजभवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन

जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती एन. एच. पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य मानवाधिका...

December 10, 2024 8:14 PM

views 30

‘देशात गरिबी, भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला’

देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संध देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. आंतरराष्टीय मानवाधिकार दिवसानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. देशात मानवाधिकारांची योग्य अंमलब...

December 10, 2024 1:02 PM

views 42

यूपीएससीच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४चा निकाल जाहीर

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत  निवड  झालेले उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड होण्यासाठी व्यक्तिमत्त्व चाचणी मुलाखतीला सामोरे जातील. या मुलाखतीच्या तारखा नंतर...

December 10, 2024 1:47 PM

views 50

रिझर्वबँकेसमोर अद्याप चलन फुगवटा आणि सायबर सुरक्षा अशा प्रकारच्या समस्या – शक्तिकांत दास

रिझर्व्ह बँक ही एक समृद्ध परंपरा असलेली एक महान संस्था आहे, असं प्रतिपादन मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सहा वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामगिरीचं श्रेय आपण या संस्थेला आणि सहकाऱ्यांना देत असल्याचं दास यांनी सांगितलं.    रिझर्व्ह बँक...

December 10, 2024 8:20 PM

views 43

मुंबईत बेस्टच्या बसच्या धडकेत ७ ठार तर ४९ जखमी, मृतांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य

मुंबईत कुर्ला इथं बेस्ट बसच्या अपघातातील मृतांची संख्या सातवर पोहचली आहे. तर, जखमींची संख्या ४९ झाली आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रूग्णालयांमधे दाखल केलं आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता ...

December 10, 2024 10:36 AM

views 34

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी युवा पिढीशी प्रधानमंत्री उद्या संवाद साधणार

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी होत असलेल्या युवा पिढीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ माध्यमातून संवाद साधणार आहेत. या स्पर्धेत १३०० हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. मुंबई पुण्यासाह देशातल्या ५१ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. पुण्याच्या एमआयटी विद्यापीठामध्ये स्मार्ट इंडि...

December 10, 2024 1:09 PM

views 41

बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी केली आहे. सध्याचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यामुळे सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायमस्वरूपी सचिवांची नेमणूक होईपर्यंत सैकिया कार्यकारी ...

December 10, 2024 10:49 AM

views 28

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय

श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताच्या संघानं श्रीलंकेवर पाच-शून्य असं वर्चस्व राखलं आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या शेवटच्या थरारक सामन्यात भारताच्या संघानं तेरा धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला. संतोषकुमार या मालिकेत एकंदर 325 धावा नोंदवून सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. ...