August 5, 2026 11:41 AM

printer

अमृत उद्यान १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान पर्यटकांसाठी खुलं

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या १६ तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून, १५ सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ सध्याकाळी ५ वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील.  या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल.

२९ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त खेळाडूंना आणि ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिना’निमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाइन नोंदणी करता येईल, असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे.