अल्जेरिया मध्ये आज झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जणं जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अल कर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरिच्या प्रशासन विभागाने दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
News On AIR | July 31, 2026 9:04 PM
अल्जेरिया मध्ये झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू, ४४ जणं जखमी