January 2, 2025 2:28 PM

views 23

दक्षिण प्रशांत महासागरातल्या वानुआतु इथल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी भारताकडून पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य

दक्षिण प्रशांत महासागरातल्या वानुआतु इथल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी भारतानं पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य दिलं आहे. गेल्या १७ डिसेंबरला वानुआतुच्या किनारपट्टीजवळ ७ पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे मोठा विनाश आणि जीवितहानी झाली होती.  

January 2, 2025 2:27 PM

views 45

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात होणार

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात होणार आहे. कान चित्रपट महोत्सवात अ-सर्टन विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डाॅग’ या चायनीज चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महोत्सवात आशियाई विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझा...

January 2, 2025 1:55 PM

views 46

नवी दिल्लीतल्या ९०० कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. जेजे क्लस्टर मधल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे १७ शे फ्लॅट्स चं ते उद्घाटन करतील, तसंच नवी दिल्लीतल्या अशोक विहार इथल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द करतील. दिल्लीतल्या दोन नागरी पु...

January 2, 2025 1:42 PM

views 25

सन २०२४ मधे देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ

२०२४ या वर्षी देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ झाली असून ती २ कोटी ६० लाखापर्यंत पोहोचली आहे. कोविड काळापूर्वीचा २०१८ मधला २ कोटी ४५ लाखाचा उच्चांक या वर्षात वाहनविक्रीने ओलांडला. वैयक्तिक उपभोगासाठी खर्च करण्य़ाची ऐपत वाढल्याचं हे निदर्शक आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचं सरकारचं धोरण ...

January 2, 2025 1:38 PM

views 48

देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम

देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम आहे. हिमाचल प्रदेश,छत्तीसगड, बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी पारा खाली गेला आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असून सिमला,मनालीच्या पर्वतीय भागांत बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या ठिकाणच्या मैदानी भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अं...

January 2, 2025 10:14 AM

views 50

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाच...

January 2, 2025 10:12 AM

views 12

नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू

नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा इथं, नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघाता...

January 2, 2025 10:04 AM

views 59

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनाण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्त...

January 2, 2025 9:59 AM

views 31

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 8 जण ठार

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं काल मालगाडी आणि चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन महीला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अन्य एका अपघातात धुळे-सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळा फाट्यावर रस्त्य...

January 2, 2025 9:57 AM

views 61

नाशिक जिल्ह्यात भरते 365 दिवसांची शाळा

भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने शिक्षक सतत कार्यरत असतात. असेच एक शिक्षक आहेत केशव चंदर गावीत. गावीत यांच्या मेहनतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुर्गम भागात असलेली एक शाळा वर्षाचे 365 दिवस सुरू असते. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.या शाळेत मुलं एकही दिवस सुटी ...