January 8, 2025 1:24 PM

views 48

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं बांग्लादेश सरकारकडून रद्द

बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागाने बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं रद्द केली आहेत. बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागारांचे उपसचिव अब्दुल कलाम आझाद यांनी ही माहिती वार्ताहर परिषदेत ...

January 8, 2025 1:14 PM

views 20

राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यात येणार

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यासाठी सरकारनं राजघाट परिसरातल्या राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये एक जागा निश्चित केली आहे. दिवंगत माजी राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या निर्णयाबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.

January 8, 2025 1:05 PM

views 33

‘बहादूर सिंग सागू’ यांची भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड

पुरुषांच्या शॉट पुट मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन ‘बहादूर सिंग सागू’ यांची भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. चंदीगड इथं काल सुरु झालेल्या महासंघाच्या दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. २०१२ पासून  या पदावर असलेले अध्यक्ष अदिले सुमारीव...

January 8, 2025 11:00 AM

views 56

आंध्र प्रदेशातील गोदावरी ग्लोबल विद्यापीठात जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात

आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम इथल्या गोदावरी ग्लोबल विद्यापीठात आजपासून जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रसिद्ध तेलगू लेखक, साहित्यिक, तसंच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण; दोन्ही तेलगू राज्यांचे राज्यपाल; क...

January 8, 2025 10:54 AM

views 25

नोएडा इथे आजपासून फार्म-टू-फोर्क व्यापार प्रदर्शन सुरु

नोएडा इथल्या इंडिया एक्स्पोझिशन मार्टमध्ये आजपासून इंडसफूड 2025 हे 'शेतातून थेट ताटात' या संकल्पनेवर आधारित फार्म-टू-फोर्क हे व्यापार प्रदर्शन सुरु होत आहे. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इंडसफूड 2025 हे आशिया...

January 8, 2025 10:39 AM

views 247

इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचे नवे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्याकडून 14 जानेवारी रोजी नारायणन पदभार स्वीकारतील.   नारायणन सध्या केरळमधील वालियामाला इथल्या इस्रोच्या एलपीएससी म्हणजे लिक्विड प्र...

January 8, 2025 10:31 AM

views 40

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सरकारी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं अनावरण

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल दिल्लीत केंद्र सरकारच्या नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्यात आलं. परिवर्तनवादी प्रशासनाच्या तत्वांना अधोरेखित करणारी जनभागीदारी से जनकल्याण ही नव्या दिनदर्शिकेची संकल्पना आहे.   गेल्या दशकभरात विविध क्षेत्रात परिवर्तनात्मक प्रश...

January 8, 2025 10:26 AM

views 71

परराष्ट्र व्यवहार मंत्री कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर असून, त्यांनी ओडिशाच्या पुरी आणि भुवनेश्वर इथल्या विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.   जयशंकर यांनी कोनार्कच्या सूर्य मंदीर, जगन्नाथ मंदीर, धौली शांती स्तूप तसंच भुवनेश्वर इथं 11 व्या शतकातल्या लिंगराज मंदिरालाही भेट ...

January 8, 2025 10:11 AM

views 53

नेपाळमधील भूकंपात आत्तापर्यंत 126 जणांचा मृत्यु

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात काल झालेल्या भुकंपातील मृतांची संख्या 126 वर पोहोचली आहे. चीनच्या अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी झालेल्या 7 पूर्णांक 1 रिख्टर पातळीच्या या भूकंपामध्ये 188 लोक जखमी झाले. भूकंपाचे केंद्र तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील झिझांग इथं होतं. इथं मालमतेचं ...

January 8, 2025 9:59 AM

views 56

आंध्र प्रदेशात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम् इथं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण, उद्घाटन तसंच पायाभरणी होणार आहे. एकंदर दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पांमध्ये पुडीमाडाका इथल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेअंतर्गत पहिल्या हरित हायड्रोजन हबचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे 1 लाख ...