January 10, 2025 7:09 PM

views 22

महाराष्ट्राला मिळणार १० हजार ९३० कोटी रुपयांहून अधिक निधी- देवेंद्र फडणवीस

केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना आज एक लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी करण्यात आलं. यात महाराष्ट्र राज्याचा १० हजार ९३० कोटी ३१ लाख रूपयांचा वाटा आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये सरकाने ८९ हजार ८६ कोटी रुपयांच्या कराचा वाटा राज्यांना दिला आहे.   भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि ...

January 10, 2025 7:07 PM

views 79

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोग स्वतंत्रपणे चौकशी करणार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे.   संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून याप्रकरणाची राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खास...

January 10, 2025 7:05 PM

views 66

महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी ‘कुंभवाणी’चं लोकार्पण

उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या 'कुंभवाणी' वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथे झालं. महाकुंभ मेळा हा उत्सव जाती धर्मापलिकडे जाऊन एकतेचा संदेश देतो असं ते यावेळी म्हणाले. याच कार्यक्रमात त्यांनी 'कु...

January 10, 2025 3:29 PM

views 51

नालासोपारा इथं रात्री झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले चारजण जखमी

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले चारजण जखमी झाले. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. परफ्यूमच्या बाटल्यांवरची वापराची शेवटची तारीख बदलण्याचा प्रयत्न करत असताना त्या बाटल्यांचा स्फोट झाला, असं पोलिसांनी सांगितलं. जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत. पुढचा त...

January 10, 2025 3:04 PM

views 48

राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली – मुख्यमंत्री

पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आज चंद्रपूरमधे आयोजित कार्यक्रम...

January 10, 2025 3:40 PM

views 65

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगाकडून गुन्हा दाखल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे. संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून याप्रकरणाची राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजर...

January 10, 2025 1:46 PM

views 35

पुरुष हॉकी इंडिया लीग : श्राची राह बंगाल टायगर्सचा सामना तामिळनाडू ड्रॅगन्सशी होणार

पुरुष हॉकी इंडिया लीगमध्ये श्राची राह बंगाल टायगर्सचा सामना आज तामिळनाडू ड्रॅगन्सशी होणार आहे. ओडिशातल्या राऊरकेला इथं होणारा सामन्याला रात्री सव्वा आठ वाजता सुरुवात होईल. दरम्यान, काल झालेल्या सामन्यांमध्ये वेदांत कलिंगा लान्सर्सने गोनासिकाचा २-१ असा पराभव केला. अँटोइन किनाला सामनावीर म्हणून घोषित ...

January 10, 2025 1:37 PM

views 36

NCCचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्या हस्ते कल्पना आणि आणि नवोन्मेष स्पर्धेचं उद्घाटन

भारतीय छात्र सेना-NCC चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी नवी दिल्लीत कल्पना आणि आणि नवोन्मेष स्पर्धेचं आज उद्घाटन केलं. हा मंच युवा वर्गाला त्यांचे विचार आणि नवीन कल्पना मांडण्याची संधी देत असल्याचं सिंह यांनी सांगितलं. एनसीसीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध शिबिरांमधून तज्ज्ञांकडून छ...

January 10, 2025 1:40 PM

views 23

ISL फुटबॉल : नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाचा सामना पंजाब एफसी संघाशी होणार

गुवाहाटी इथल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाचा सामना आज पंजाब एफसी संघाशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात ओदिशा एफसी या संघाने चेन्नईन एफसी सोबत २-२अशी बरोबरी साधली होती.

January 10, 2025 1:25 PM

views 45

केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्याने रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार – मंत्री अश्विनी वैष्णव

मेक इन इंडिया योजनेंतर्गत केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्याने रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूर इथे दोन कंपन्यांच्या चाक निर्मिती विभागांना भेट दिल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सध्या रेल...