January 13, 2025 4:02 PM

views 20

कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी मस्साजोग ग्रामस्थांचं आंदोलन

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज मस्साजोगमधल्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यात देशमुख यांचा भाऊ धनंजय यांच्यासह कुटुंबीय सहभागी झाले होते. तपासाची माहिती आपल्याला आणि ग्रामस्थांनी द्यावी तसंच आरोपी...

January 13, 2025 2:46 PM

views 33

युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेले उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला प्रस्ताव

रशियाच्या तुरुंगात असलेल्या युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेले उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला दिला आहे. रशियाच्या पश्चिम कुर्स्क प्रदेशातून हे दोन जवान ताब्यात घेतल्याचं झेलेन्स्की यांनी समाजमाध्यमावरल्या स...

January 13, 2025 2:34 PM

views 32

देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे – उपेंद्र द्विवेदी

देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे, अस लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज असून सीमाभागात पायाभूत सुविधा मजबूत करणं हे भारतीय लष्कराचं उद्दिष्ट आहे, असं द्विवेदी म्हणाले. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ...

January 13, 2025 2:28 PM

views 17

महिला हॉकी इंडिया स्पर्धेत आज जेएसडब्ल्यू सूरमा हॉकी क्लब विरुद्ध श्राची रार बंगाल टायगर्स या संघांमध्ये होणार सामना

महिला हॉकी इंडिया स्पर्धेत आज जेएसडब्ल्यू सूरमा हॉकी क्लब विरुद्ध श्राची रार बंगाल टायगर्स या संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा मैदानावर संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेला सुरुवात झाली असून सलामीच्या लढतीत ओदिशा वॉरियर्सने दिल्ली एसजी पायपर्सचा ४-० असा पर...

January 13, 2025 2:26 PM

views 18

विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत हरियाणा, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्र या राज्यांचे संघ पोहोचले उपांत्य फेरीत

विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत हरियाणा, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्र या राज्यांचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये हरियाणाने गुजरातच्या संघाचा २ गडी राखून पराभव केला तर विदर्भ संघाने राजस्थानच्या संघाचा ९ गडी राखून पराभव केला. उद्या आणि परवा उपांत...

January 13, 2025 2:23 PM

views 32

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींनी लोहडी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू या सणानिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज साजऱ्या होत असलेल्या लोहडी तसंच उद्या देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू या सणानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिक असणारे हे सण, सर्वांच्या जीवनात उत्साह आणि ...

January 13, 2025 2:30 PM

views 48

परराष्ट्र व्यवहार मंत्री आजपासून 3 दिवसांच्या स्पेन दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच स्पेन दौरा आहे. या भेटीदरम्यान ते स्पेनचे परराष्ट्रमंत्री मॅन्युएल अल्बरेस यांच्या बरोबर द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक तसंच दोनही देशांसाठी महत्वाच्या जागतिक मुद्यांवर चर्चा करत...

January 13, 2025 3:49 PM

views 42

श्रीनगर – सोनमर्ग रस्त्यावरच्या बोगद्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जम्मू काश्मीर मधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान बारमाही रस्ता उपलब्ध होईल. सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या सोनमर्ग बोगदा प्रकल्पासाठी २ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असून हा बोगदा भूस्खलन आणि हिम...

January 13, 2025 1:46 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या डॉकयार्ड इथं नौदलाच्या ३ युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहेत. या ३ युद्धनौका नौदलात सामील होणं हे संरक्षण उत्पादन आणि ...

January 13, 2025 1:40 PM

views 16

देशभरात लोहडी, भोगी, माघ बिहू इत्यादी सुगीच्या सणांचा उत्साह

मकरसंक्रांतीचं पर्व देशभरात उत्साहाने सुरु झालं. आज संक्रांतीचा आदला दिवस. देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो. पंजाब, हरयाणा आणि उत्तर भारतात लोहडी, ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमधे माघ बिहू, महाराष्ट्र आणि तेलंगणात भोगी म्हणून साजरा केला जातो. गुजरातमधे उत्तरायणानि...