January 14, 2025 8:27 AM

views 19

महाराष्ट्र केसरी मैदानाचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मातीपूजन

अहिल्यानगर इथं २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरीमध्ये काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कुस्तीच्या मैदानाचं मातीपूजन करण्यात आलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी एक कोटी रुपये देण्याचा तसंच महाराष्ट्र केसरी आणि ह...

January 14, 2025 2:55 PM

views 27

राज्यात मकरसंक्रांती सणाचा उत्साह

मकरसंक्रांतीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा होत आहे. तीळगूळ घ्या गोड बोला असं आवाहन करत संक्रांती निमित्त शुभेच्छांची देवाण घेवाण होत आहे. घरोघरी ताजे हरभरे, उसाचे करवे बोरं आणि सौभाग्यचिन्हांनी सजलेल्या मातीच्या सुगडांचं पूजन आज केलं जातं. याशिवाय दानधर्मही केला जातो. राज्यात ठिकठिकाणच्या मंदिरांम...

January 13, 2025 8:44 PM

views 87

गेल्या ५ वर्षात बेस्ट बस झालेल्या ८३४ अपघातात ८८ नागरिकांचा मृत्यू

गेल्या ५ वर्षात बेस्ट बस झालेल्या ८३४ अपघातात ८८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांना ४२ कोटी ४० लाख रुपयांची भरपाई दिल्याचं बेस्टनं माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जात सांगितलं आहे. या अपघातांमुळं १२ कर्मचारी बडतर्फ झाले तर २४ जणांचं निलंबन झालं. गेल्या ५ वर...

January 13, 2025 8:41 PM

views 55

शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन तत्परतेने सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागानं करायच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. राज्यातल्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या...

January 13, 2025 8:40 PM

views 60

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर करायला विलंब का झाला, यावरुन दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्लीतल्या आप सरकारला धारेवर धरलं. याबाबत भाजपानं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी आज न्यायालयानं केली. त्याबरोबरच, दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी भाज...

January 13, 2025 8:37 PM

views 49

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवा असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.    नवी मुंबईत श...

January 13, 2025 8:30 PM

views 32

नायजेरियात झाम्फारा राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार

नायजेरियात झाम्फारा या राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्यांमध्ये स्थानिक सतर्क गटातल्या सदस्यांचा समावेश होता. गुन्हेगारांचा माग काढून परतत असताना गुन्हेगारी टोळ्या जात असल्याचा गैरसमज झाल्याने हा हल्ला क...

January 13, 2025 8:56 PM

views 38

उत्तर प्रदेशात महाकुंभ मेळ्याला सुरुवात, पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचं अमृत स्नान

महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृत स्नानानं सुरुवात झाली. या महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवशी स्नानासाठी आलेल्या भाविकांचं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आलं. २६ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्री पर्यंत चालणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी...

January 13, 2025 8:29 PM

views 23

कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात २४ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात ठार झालेल्यांची संख्या २४ झाली आहे. या वणव्यामुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात शेती, पायाभूत सुविधा, विस्थापित नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा यांचा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे. या आर्थिक नुकसानाचं प्...

January 13, 2025 8:28 PM

views 34

आरोग्यविषयक कार्यक्रम अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली राज्यात तिसरा

आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयानं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यानं गरोदर माता नोंदणी, माता - बाल संगोपन, मुलांचं लसीकरण, हिवताप आणि क्षयरोग निर्मूलन अशा वेवेगवेगळ्या ६४ आरोग्य निर्देशांकांत केलेल्या काम...