January 14, 2025 3:11 PM

views 22

देशातल्या ६३२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड

या हंगामात देशातल्या ६३२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड झाली आहे, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गव्हाच्या लागवडीत गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली असून यंदा ३२० लाख हेक्टरवर गहू लावण्यात आला आहे. डाळींची लागवड १३९ लाख हेक्टरवर तर भरडधान्याची ला...

January 14, 2025 3:11 PM

views 51

गेल्या डिसेंबरमध्ये चलनफुगवट्याच्या दरात २.३७ टक्क्यांनी वाढ

गेल्या डिसेंबरमधे देशात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात २ पूर्णांक ३७ शतांश टक्क्यांनी वाढ झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की अन्नधान्यांच्या  किमती काही अंशी घसरल्या मात्र कारखान्यात तयार होणारी उत्पादनं काहीशी महागली. त्यामु...

January 14, 2025 3:21 PM

views 63

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं प्रयागराज इथं निधन

सोलापूर महापालिकेचे माजी महापाैर महेश विष्णूपंत काेठे यांचं आज सकाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. कोठे प्रयागराज इथं कुंभमेळ्याला गेले होते. आज सकाळी स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. साेलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व अस...

January 14, 2025 1:56 PM

views 51

संरक्षण दलाच्या तिन्ही दलाची भूमिका महत्वाची – मंत्री नितीन गडकरी

संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस साजरा होत आहे. या निमित्त नागपूरच्या वायुुसेनानगर इथं मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव केला. संरक्षण क्षेत्रात ...

January 14, 2025 1:49 PM

views 29

Australian Open 2025 : रोहन बोपण्णा आणि निकोलस बॅरिएंटोसचा पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कोलंबियाचा जोडीदार निकोलस बॅरिएंटोस या जोडीला पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझ आणि जाऊमा मुनार या जोडीनं त्यांच्यावर ७-५, ७-६ अशी थेट सेट्समध्ये मात केली. दरम्यान, उद्या ऋत्विक ...

January 14, 2025 1:42 PM

views 32

देशातल्या काही भागात दाट धुकं पडण्याची शक्यता

हिमाचल प्रदेशातील काही भागात थंडीची लाट तसंच पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उत्तरप्रदेशात दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं  वर्तवली आहे. राजस्थान, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि वायव्येकडच्या राज्यातही हीच परिस्थिती असेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. कन्याकुमारी आणि आसपासच्या  प्रदेशा...

January 14, 2025 3:30 PM

views 45

ISL Football : केरला ब्लास्टर क्लबचा ओदिशावर ३-२ असा विजय

फूटबॉलच्या इंडियन सुपर लीग मध्ये काल झालेल्या सामन्यात केरला ब्लास्टर फूटबॉल क्लबने ओदिशा फूटबॉल क्लबवर ३-२ असा विजय मिळवला. ब्लास्टरने शेवटच्या अर्ध्या तासात तीन गोल करत  बाजी मारली. जेरी मविहमिंगथांगाने ओदिशाला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली होती.  साठाव्या मिनिटाला क्वामे पेपराहने गोल करत बरोबरी सा...

January 14, 2025 1:36 PM

views 52

इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन : ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीचा १६व्या फेरीत प्रवेश

इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीने १६व्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी तैवानच्या सू या चिंग आणि चेन चेंग कुआन या जोडीचा  ८-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. या स्पर्धेच्या महिला दुहेरी प्रकारात अमृता प्रथमेश आणि सोनाली सिंग या ...

January 14, 2025 1:21 PM

views 50

ई-मोबिलिटी या विषयातला ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम मार्चपासून सुरू होणार

मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ई-मोबिलिटी या विषयातला ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या मार्चपासून सुरू होणार आहे. १८ महिन्यांचा हा अभ्यासक्रम ‘ग्रेट लर्निंग’ या संस्थेच्या सहकार्याने आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी तयार केला आहे. या क्षेत्रात काम करणारे, वैज्ञानिक, संशोधक यांना या अभ...

January 14, 2025 1:12 PM

views 23

US : लॉस एंजेलिस इथं लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर

अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले असून अन्य ८९ हजार जणांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात वणव्यामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण बेपत्ता आहेत. या परिसरात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे...