January 16, 2025 1:48 PM

views 33

केंद्रीय गृहमंत्री आज देशातल्या सात विमानतळांवरच्या जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं करणार उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचिन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं उद्घाटन करणार आहेत. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विनाअडथळा होण्यासाठी मदत होणार आहे. य...

January 16, 2025 2:50 PM

views 36

ओपेक ने २०२६ पर्यंत जागतिक पातळीवर तेलाच्या मागणी वाढीचा अंदाज वर्तवला आहे

वर्ष २०२६ पर्यंत जागतिक पातळीवर तेलाची मागणी १४ लाख ३० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढून १ हजार ६६ लाख बॅरल प्रति दिवस इतकी होईल, असा अंदाज पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना ‘ओपेक’ने वर्तवला आहे. या वर्षी ही मागणी १४ लाख ५० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढण्याचा ‘ओपेक’चा अंदाज आहे. जगातल्या मो...

January 16, 2025 1:43 PM

views 48

इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत आज अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करण्यात आली. असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं आणि संशोधकांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं मिळवलेलं हे यश आगाम...

January 16, 2025 1:41 PM

views 57

इस्रायल आणि हमास यांची युद्धबंदीसाठी सहमती

इस्रायल आणि हमास यांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. कतारचे प्रधानमंत्री मोहंमद बिन अब्दुल रेहमान अल-थानी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर या कराराचं स्वरूप निश्चित करण्यात आलं. या कराराची अंमलबजावणी रविवारपासून होणार असून ही युद्धबंदी ४२ दिवसांची असेल. अल थानी यांनी काल दोहामध्ये या कराराबाबत माहित...

January 16, 2025 10:45 AM

views 50

अमेरिकेने निर्यात नियंत्रण यादीतून भारताच्या तीन आण्विक संस्थांवरचे उठवले निर्बंध

अमेरिकेनं भारताच्या भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय दुर्मीळ पृथ्वीविज्ञान केंद्र आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र या तीन संस्थांवरचे निर्बंध उठवले आहेत. अमेरिकेच्या उद्योग आणि सुरक्षा विभागानं ही घोषणा केली. शीतयुद्धाच्या काळात लादण्यात आलेले हे निर्बंध अमेरिकेच्या परदेशी धोरण उद्दिष्टांमध्ये सुधारणा...

January 16, 2025 10:30 AM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत घेणार भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत भेट घेतील. षण्मुगरत्नम राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करतील. राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी देखील देतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत सिंगापूरच्या अध्यक...

January 16, 2025 9:50 AM

views 46

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कडक कारवाई होणार- नरहरी झिरवाळ

राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणाहून दुधाचे १ हजार ६२ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच तसंच पिशवी पॅकिंग आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचा समावेश आहे. या तपासणी नमुन्यात दोषी ...

January 16, 2025 9:38 AM

views 31

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचा उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजयी घोडदौड सुरु ठेवत उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरु संघाचा ७०- ३८ असा, तर महिला संघानं इराणचा १०० - १६ अशा मोठ्या गुण फरकाने पराभव केला.  

January 16, 2025 9:34 AM

views 36

एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं नांदेड येथे उद्घाटन

एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं काल नांदेड इथं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. देशभरातून आलेल्या सर्व राज्याच्या संघानी आपापल्या राज्याच्या झेंडा फडकवत संचलन केलं, त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहण तसंच दीप प्रज्वजलन करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

January 16, 2025 9:31 AM

views 42

महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या ‘अटल’ या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या 'अटल' या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल...