January 16, 2025 3:28 PM

views 68

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून सुरू केला बेमुदत संप

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मजुरीत वाढ करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. जोपर्यंत मजुरी वाढ होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.  

January 16, 2025 2:42 PM

views 40

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर ६-४, ६-३ अशी सहज मात केली. बालाजी हा या स्पर्धेत टिकून असलेला एकमेव भारतीय टेनिसपटू आहे.

January 16, 2025 2:37 PM

views 14

एफसी बार्सिलोना आणि अँटलिंटको माद्रिद यांची कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

माद्रिद इथं सुरू असलेल्या कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत एफसी बार्सिलोना आणि अँटलिंटको माद्रिद या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बार्सिलोनाने रिअल बेटीसवर ५-१ असा विजय मिळवला. दुसरीकडे अँटलिंटको माद्रिदनं प्रतीस्पर्धी संघ ‘इलचे’चा ४-० असा पराभव केला. व्हेलेंशिया, लेगान्स आणि गेटाफे सं...

January 16, 2025 2:21 PM

views 39

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेला आज ९ वर्षं पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेला आज ९ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर विशेष संदेश लिहिला आहे. सरकारने देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या...

January 16, 2025 2:18 PM

views 58

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. बवाना मतदारसंघातून सुरेंदर कुमार, करोल बागमधून राहुल धनक निवडणूक लढणार आहेत. सुरेश गुप्ता हे रोहिणी मतदारसंघातून, तुघलकाबाद इथून विरेंदर बिधुरी आणि बद्रापूर इथून अर्जुन भदाना निवडणूक लढणार आहेत. त्याआधी मंगळवारी काँग्रे...

January 16, 2025 2:15 PM

views 17

पंजाब सरकार शहीद भगतसिंह यांच्या मूळ गावी वारसा मार्गाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री भगवंत मान

पंजाब सरकार शहीद भगतसिंह यांच्या मूळ गावी वारसा मार्गाची निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल केली. संग्रहालयापासून भगतसिंहांच्या वडिलोपार्जित घरापर्यंत ८५० मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे, असं मान यांनी सांगितलं. यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातलं राज्याचं योगदान अधोरे...

January 16, 2025 2:13 PM

views 26

प्रयागराज येथे ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून संस्कृती आणि भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनही केलं जात आहे. ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं आहे. देशात पर्यावरण आणि जल संवर्धनासाठी काम करणारे एक हजारांहून अधिक कार्यकर्ते या दिवशी प्रयागराजला येणार आहेत. यावेळी निसर्ग, पर्यावरण, जल आणि स्वच...

January 16, 2025 2:11 PM

views 52

संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी

पश्चिम बंगालमध्ये काल एका संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या संशयितासह इतर दोघांना राजगंज इथल्या सुधारगृहात नेत असताना त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

January 16, 2025 2:08 PM

views 51

दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता – हवामान विभाग

दिल्ली आणि परिसरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे तापमानात घट झाली असली तरी दृश्यमान्यता सुधारली आहे. दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेला होत असलेल्या हवामान बदलाचा फटका राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीला बसत असल्याची ...

January 16, 2025 1:51 PM

views 53

सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत

राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही देश डिजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या वाटेवर वाटचाल करत आहेत. गुजरातची गिफ्ट सिटी आणि सिंगापूर दरम्यान अपांरपरिक ऊर्जा निर्म...