January 17, 2025 8:36 PM

views 78

फोनवरुन होणारी फसवणूक टाळण्यासाठी संचार साथी ॲपचं अनावरण

फोनकॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक तसंच मोबाईलचा गैरवापर यांना आळा घालण्यासाठी संचार साथी नावाच्या नवीन ॲपचं अनावरण आज केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं. ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त कुटुंबाना इंटरनेट सुविधा मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या नॅशनल ब्रॉडबँड मिशनच्या दुसऱ्या ...

January 17, 2025 7:35 PM

views 89

राज्य सरकारकडून AI धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना

  राज्य सरकारनं आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि सायबर सुरक्षा धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान संचालक या दोन्ही कृती दलाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय खासगी क्षेत्रातल्या अनेक तज्ञांचा समावेश यामध्ये आहे. AI धोरण राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देईल, असं माहिती तं...

January 17, 2025 7:39 PM

views 58

पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी एका टेम्पोनं मिनीव्हॅनला दिलेल्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजता नारायणगावजवळ घडली. ही मिनीव्हॅन नारायणगावच्या दिशेनं जात असताना पाठीमागून टेम्पोनं धडक दिल्यानं ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या बसवर आदळली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलि...

January 17, 2025 1:52 PM

views 62

विश्वचषक खोखो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

विश्वचषक खोखो स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला असून आपापल्या गटात दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत.   नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या संघानं काल भूतानवर ७१-३२ असा विजय मिळवला. तर महिल...

January 17, 2025 1:51 PM

views 11

भारत आणि अमेरिका दोघांनाही बेंगळुरूमधील वाणिज्य दूतावासाचा फायदा होईल- परराष्ट्र व्यवहार मंत्री

अमेरिकेसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी बंगळुरूमधल्या नवीन अमेरिकी वाणिज्य दूतावासामुळे चालना मिळेल, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज बेंगळुरूमध्ये अमेरिकेच्या नवीन वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. जयशंकर म्हणाले की दोन्ही देशांमध्ये कृत्रिम बुद्धीम...

January 17, 2025 1:48 PM

views 51

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि चीनची शुआई झांग जोडी विजयी

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या मेलबर्न इथं आज झालेल्या सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि चीनची शुआई झांग जोडी विजयी ठरली. पहिल्या फेरीत या जोडीनं क्रोएशियाचा इवाना डोडिग आणि फ्रान्सची क्रिस्टीना म्लादेनोविक या जोडीचा ६-४,६-४असा पराभव करत पुढची फेरी गाठली.   ऑस्ट्रेलियन खु...

January 17, 2025 1:44 PM

views 22

छत्तीसगढमध्ये 12 नक्षलवादी ठार

  छत्तीसगडमध्ये काल माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीच्या ठिकाणावरून सुरक्षादलानं १२ माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यातल्या पामेड आणि बासागुडा विभागात काल ही चकमक झाली होती.   हे नक्षलवादी पीएलजी बटालियन नंबर वन आणि सेंट्रल रिजनल कमीटीचे सदस्य असल्याचं पोलिसां...

January 17, 2025 1:42 PM

views 30

यून सुक येओल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका सेऊल इथल्या न्यायालयाने फेटाळली आहे. येओल यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.   येओल यांना झालेली अटक अवैध असल्याचा तसंच या प्रकरणाचा तपास व...

January 17, 2025 1:38 PM

views 52

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला खेळाडू अग्रमानांकीत पी. व्ही. सिंधुने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर मैदानात काल झालेल्या सामन्यात तिने जपानच्या मनामी सुईझू हिचा २१-१५, २१-१३, असा पराभव केला.   उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा सामना इंडोनेशियाच्या ग्रे...

January 17, 2025 1:34 PM

views 39

इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविराम लागू झाल्याची नेतान्याहू यांची घोषणा

कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातल्या वाटाघाटीनंतर गाझामध्ये ओलिस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी आणि युद्धविराम लागू करण्यासाठी करार झाला असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी आज जाहीर केलं.   नेतन्याहू यांनी करारावर मतदान घेण्यासाठी आज सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती, त...