January 18, 2025 8:31 PM

views 40

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणी एकाला अटक

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी रेल्वे पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्गमधून एकाला अटक केली आहे. दुर्ग रेल्वे स्थानकावरुन त्याला ताब्यात घेतलं. रात्रीपर्यंत मुंबई पोलीस तिथे पोहोचून त्याची चौकशी करतील आणि त्याचा ताबा घेतील.

January 18, 2025 8:26 PM

views 71

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर इतर शाळा, महाविद्यालयातल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिले आहेत. यासोबतच या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियानातर्गंत जनजागृती साप्ताह राबवला जाणार अस...

January 18, 2025 8:23 PM

views 43

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई प्रारुप लागू करणार

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रारुप लागू करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. याची अंमलजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी हे प्रारु...

January 18, 2025 8:35 PM

views 51

तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवले-अश्विनी वैष्णव

देशात तंत्रज्ञानावर कोणत्याही विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी असू नये, तर ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावं, तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण व्हावं, हे उद्दिष्ट ठेवून गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विन...

January 18, 2025 3:33 PM

views 15

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार – मुख्यमंत्री

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते.   ग्रामीण आणि दुर्गम...

January 18, 2025 3:32 PM

views 31

४ हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून घेतली माघार

राज्यातल्या जवळपास ४ हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात शंभर - दीडशे अर्ज आले होते. तर उर्वरित या महिन्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या.   या महिलांना परत केलेले पैसे विविध कल्याणकारी योजनांसाठी...

January 18, 2025 3:23 PM

views 11

मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी एकच तिकीट वापरता येणार

मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो, मोनो आणि एसटीने प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही माहिती दिली.

January 18, 2025 3:25 PM

views 57

गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठित केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातले किल्ले आणि गडावर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं.   त्य...

January 18, 2025 3:19 PM

views 14

टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत पराभव,तर महिलांच्या एकेरीत दुसरे मानांकन

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत, पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या के. एन बालाजी आणि त्याच्या मेक्सिकन साथीदाराचा पराभव झाला. पोर्तुगालच्या जोडीनं त्यांना ७-६, ४-६, ६-३ असं पराभूत केलं. महिलांच्या एकेरी सामन्यात दुसरे मानांकन प्राप्त पोलंडची टेनिसपटू इगा स्वियाटेक हिने ब्रिटनच्या एम्मा राडुकानू चा ६-१...

January 18, 2025 2:58 PM

views 38

केरळमधे उद्यापर्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता

पंजाब, हरयाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात रात्रीच्या वेळी दाट धुकं पडेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथं उद्यापर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे.   मच्छिमारां...