January 20, 2025 7:44 PM

views 28

Delhi Election : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३९७ गुन्हे दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३९७ गुन्हे दाखल केले आहेत. एका निवेदनाद्वारे दिल्ली पोलिसांनी आज ही माहिती दिली. एका निवेदनात, 212 विना परवाना शस्त्रं, सुमारे 36 हजार लिटर दारू आणि 15 कोटी रुपये किमतीचे सुमारे 75 किलोग्...

January 20, 2025 7:44 PM

views 53

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाची समान नागरी संहितेला मान्यता

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाने आज समान नागरी संहितेला मान्यता दिली. तात्काळ प्रभावानं त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केली. या निर्णयामुळे उर्वरित राज्यांना त्याची प्रेरणा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  

January 20, 2025 7:24 PM

views 43

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या यानिक सिनरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित इटलीचा यानिक सिनर यानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चौथ्या फेरीत त्यानं अटीतटीच्या सामन्यात डेन्मार्कच्या होल्गर रूने याच्यावर ६-३, ३-६, ६-३, ६-२ अशी मात केली. तर महिला एकेरीत सहाव्या मानांकित कझाकस्तानच्या एलेना रिबाकीना हिला पराभवाचा धक्का बसला. अम...

January 20, 2025 7:21 PM

views 50

आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी प्रणालीच्या चाचणीसाठी नवी मुंबईत प्रयोगशाळेचं भूमिपूजन

संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह उत्पादनं आणि वैद्यकीय उपकरणांच्या विकास आणि उत्पादन मानकांसाठीच्या केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेचं भूमिपूजन आज नवी मुंबईत झालं. समीर अर्थात सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या आवारात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र...

January 20, 2025 7:17 PM

views 41

कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याला सरकारचं प्राधान्य-डॉ. मनसुख मांडविय

देशात ७० ते ८० लाख असंघटित कामगार असून कोणताही भेदभाव न करता कामगारांना सामाजिक सुरक्षा देणं याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आज सांगितलं. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना संघटित बनवणं आणि त्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळवून देणं या विषयावरच्या द...

January 20, 2025 3:26 PM

views 52

१०व्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिनेदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साउंड डिझायनर पद्मश्री रसुल प...

January 20, 2025 3:06 PM

views 47

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज – मंत्री पंकजा मुंडे

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज असून त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नागपुरात केलं. माफसू अर्थात महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्य...

January 20, 2025 3:38 PM

views 36

अक्षय शिंदेच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा न्यायालयीन चौकशी अहवालाचा निर्वाळा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काउंटरमध्ये झालेल्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याचा निर्वाळा न्यायालयीन चौकशी अहवालात दिला आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला आज सादर करण्यात आला. आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा वाप...

January 20, 2025 3:27 PM

views 19

८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं पाटणा इथं उद्घाटन

विधीमंडळाद्वारे देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्त्वाची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर आहे, असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. पाटण्यात सुरू झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. विधीमंडळात होणारे गोंधळ आणि त्यांचं पावित्र्य ज...

January 20, 2025 8:17 PM

views 16

आर जी कार रुग्णालयातल्या बलात्कार आणि खूनप्रकरणी दोषीला जन्मठेप

पश्चिम बंगालमधल्या आर जी कार रुग्णालयातल्या डॉक्टरवरच्या बलात्कार आणि खूनप्रकरणी दोषीला न्यायालयानं जन्मठेपेशी शिक्षा सुनावली आहे. सियालदाहमधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला. पीडीतेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. आरोपी संजय राय याला शनिवारी दोषी ठरवल...