January 21, 2025 7:11 PM

views 54

जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्यात गुंतवणुकीसाठी साडे ३ लाख कोटी रुपयांचे करार

दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज एकंदर ३ लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. ...

January 21, 2025 8:10 PM

views 25

जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडन यांनी काढलेले ७८ धोरणात्मक आदेश मागे घेतले आहेत. तसंच काही आदेश नव्यानं लागू केले आहेत. अमेरिकेत बेकायदा वास्तव्याला असलेल्यांच्या तसंच पर्यटक, विद्यार्थी आणि वर्क व्हिसावर आलेल्यांच्या मुलांना जन्मामुळे आपोआप मिळणारं नागरिकत्व रद्द करण्या...

January 21, 2025 7:08 PM

views 76

छत्तीसगड आणि ओदिशात २३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आणि ओदिशामधल्या नुआपाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत २३ नक्षलवादी मारले गेले. त्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं.   या कारवाईत ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदे...

January 21, 2025 7:02 PM

views 47

ट्रम्प यांच्या निर्णय धडाक्यानंतर देशातले शेअर बाजार कोसळले

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारांवर उमटले. जागतिक व्यापारासाठी ब्रिक्स राष्ट्रांना लक्ष्य करून अमेरिकन डॉलवरचं अवलंबित्व कमी करणाऱ्या देशांवर १०० टक्के कर लादण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारताच्या दोन्ही शेअर बाजारांमध्ये तीव्र घस...

January 21, 2025 3:19 PM

views 43

बीड : जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. पण बीड जिल...

January 21, 2025 3:14 PM

views 38

८५व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा आज समारोप

विधिमंडळांची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी त्यांचे सदस्य वचनबद्ध असल्याचं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज व्यक्त केलं. पाटणा इथं अध्यक्षतेखाली आयोजित ८५व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा आज समारोप झाला. समारोपाच्या भाषणात बिर्ला बोलत होते. ही परिषद फलदायी ठरली असून नव्या तंत...

January 21, 2025 3:32 PM

views 49

दिल्ली निवडणुकांसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा भाग जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा टप्पा भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांसमोर आज जाहीर केला. या संकल्पपत्रात दिल्लीतल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी १५ हजार रुपयांची मदत, तसंच दोन वेळचा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड करण्याचं आश्वासन दिलं आहे. भाज...

January 21, 2025 3:33 PM

views 49

Women Cricket : १९ वर्षांखालच्या T20 आयसीसी विश्वचषक सामन्यात भारताची मलेशियावर मात

महिला क्रिकेटमधे १९ वर्षांखालच्या टी ट्वेंटी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अ गटातल्या सामन्यात आज यजमान मलेशियाचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी क्वालालंपूरच्या मैदानात उतरलेल्या मलेशियाला फक्त ३१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या वैष्णवी शर्मानं ५ तर आयुषी शुक्लानं ३ ग...

January 21, 2025 3:33 PM

views 12

आदिवासी बहुल प्रदेशातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रधानमंत्री जनमन परिषदेचं आयोजन

केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीनं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रधानमंत्री जनमन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम आणि राज्यमंत्री दुर्गादास उईके हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री जनमन अभियानाचा उद्देश शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हा अ...

January 21, 2025 3:01 PM

views 53

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

मराठी भाषेतल्या साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी २०२४ या वर्षाकरता अर्ज मागवण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तकं या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात य...