January 23, 2025 3:33 PM
7
लातूर जिल्ह्यात ४ हजार कोंबड्या मृत्युमुखी
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव इथं ४ हजाराहून अधिक कोंबडीची पिल्लं काल संध्याकाळी अचानक मृत्युमुखी पडली. पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळेगावमध्ये दाखल झालं आहे. मृत पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने पुण्यात औंधच्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठवल्याचं या दलानं सांगितलं...