January 24, 2025 3:33 PM

views 37

वक्फ सुधारणा विधेयकाबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक गदारोळामुळे स्थगित

वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत गदारोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या १० खासदारांना समितीतून निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेस, डीएमके, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांचा यात समावेश आहे. तृणमूल काँग्रेसचे खास...

January 24, 2025 1:35 PM

views 25

अमेरिकेतील माजी ३ नेत्यांच्या हत्या दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्याच्या आदेशावर डोनल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतले तीन माजी नेते, जॉन एफ केनेडी, रॉबर्ट एफ केनेडी आणि मार्टिन लुथर किंग जुनिअर यांच्या हत्येसंदर्भातल्या नोंदी आणि दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, त्यांचे बंधू रॉबर्ट एफ केनेडी आणि मान...

January 24, 2025 1:29 PM

views 12

राम गोपाल वर्मा यांना चेक बाउन्स प्रकरणात तीन महिन्यांचा कारावास

अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं काल प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना चेक बाउन्स प्रकरणात तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच वर्मा यांनी तीन महिन्यांच्या आत ३ लाख ७२ हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश ही न्यायालयानं दिले आहेत.   वर्मा हे खटल्याच्या वेळी अनुपस्थित असल्...

January 24, 2025 1:26 PM

views 18

नवी दिल्लीत बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टम – संजयचं उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टम - संजयचं उद्घाटन केलं. या वर्षी मार्चपासून तीन टप्प्यात ही यंत्रणा भारतीय सैन्यात समाविष्ट केली जाईल. ही प्रणाली विशाल भू-सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी, घुसखोरी आणि हल्ले रोखण्यासाठी आणि युद्ध परिस्थितीचं अचूक विश्लेषण करायला मद...

January 24, 2025 1:50 PM

views 12

राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त मुलींना सक्षम बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जात आहे. मुलींचे अधिकार, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याविषयी समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टीनं दरवर्षी २४ जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो.  “उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणं” ही यावर्षीच्या बालिका दिनाची संकल्पना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

January 24, 2025 1:21 PM

views 54

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराला वेग

येत्या ५ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून सर्व प्रमुख पक्षांचे नेते जाहीरसभा, रॅली, रोड शो आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहे.   उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, आज दिल्ली मतदारसंघात रॅली घेणार असून भाजपा नेते अनुर...

January 24, 2025 1:19 PM

views 45

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून नोवाक जोकोविचने माघार घेतल्याने अलेक्झांडर झ्वेरेव अंतिम फेरीत दाखल

मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुखापतीमुळे अचानक माघार घेतली.    नोवाक जोकोविच आणि जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात  झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला सेट ७-६ असा गमावल्यावर नोवाक जोकोविचनं स्पर्धेतून मध्येच म...

January 24, 2025 1:10 PM

views 20

महाकुंभ मेळ्यात आजपासून तीन दिवस नयनरम्य ड्रोन शो

प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात आजपासून तीन दिवसांच्या नयनरम्य ड्रोन शो ला सुरुवात होणार आहे. या विशेष ड्रोन शो मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सनातन धर्माची वैशिष्टयं, परंपरा आणि वारसा दाखवला जाणार आहे. याशिवाय महाकुंभ मेळ्याचं धार्मिक महत्व आणि त्यामागील कथा हे या ड्रोन शो चं मुख्य आकर्षण अस...

January 24, 2025 1:05 PM

views 12

प्रधानमंत्र्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारचे माजी मुख्यमंत्री, भारतरत्न दिवंगत कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली  वाहिली आहे. ठाकूर यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्यायासाठी समर्पित केलं, त्यांचा आदर्श देशातल्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या...

January 24, 2025 10:37 AM

views 63

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्या वीस षटकांचा सामना

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या संघांमध्ये उद्या वीस षटकांचा सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालचा भारताचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य असा आघाडीवर आहे.