January 27, 2025 1:29 PM

views 36

झारखंडमध्ये ६ सायबर गुन्हेगारांना अटक

झारखंडमधल्या जामतारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ सायबर गुन्हेगारांना अटक केली असून एक आंतरराज्य टोळी उघडकीस आणली आहे. सरकारी बँकांमधल्या खात्याच्या माहितीचा दुरुपयोग करून १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची सायबर फसवणूक या प्रकरणी झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एहतेशाम वकारिब यांनी आज दिली. या प्रकरण...

January 27, 2025 1:20 PM

views 28

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर ३ दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीवर जात आहेत. या भेटीदरम्यान ते दोन्ही देशांच्या दृढ भागीदारीचा आढावा घेतील तसंच परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या क्षेत्रांबद्दल चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशातली धोरणात्मक भागीद...

January 27, 2025 1:17 PM

views 50

गृहमंत्री अमित शहा प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. त्रिवेणीसंगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत.   दरम्यान, परवा २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक...

January 27, 2025 1:14 PM

views 50

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समृद्धीसाठी केंद्र सरकार हर तऱ्हेनं प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. ७६ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित शेतकऱ्यांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आधुनिक...

January 27, 2025 12:39 PM

views 58

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना बंडाचं नेतृत्व केल्याप्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी

दक्षिण कोरियाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना, मागच्या महिन्यात त्यांच्या देशात झालेल्या बंडाचं नेतृत्व केल्याप्रकरणात, काल न्यायालयानं दोषी ठरवलं. देशात मार्शल लॉ लागू केल्यानंतर अशा आरोपांचा  सामना करणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. येओल यांच्यावर महाभियोग खटला देखील चालवला जात आह...

January 27, 2025 12:41 PM

views 71

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं निधन

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या देहदानाच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव आज रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलं. १९७७ पासून २००६ पर्यंत ते आकाशवाणीच्या सेवेत होते.  रंगभूमीवर...

January 27, 2025 12:41 PM

views 26

खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप

खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होत आहे. भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या पुरुष संघांमधे आईस हॉकीमध्ये आज अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकून, पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

January 27, 2025 9:35 AM

views 16

श्रीलंकेच्या नौदलाकडून ३४ भारतीय मच्छिमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलानं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३४ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. बेकायदेशीर मासेमारीसाठीच्या तीन ट्रॉलिंग बोटीही जप्त केल्या आहेत. या बोटींनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे उल्लंघन केल्याबद्दल त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापूर्वीही, ४१ भारतीय मच्छिमारांना देशात परत पाठवण्यात ...

January 27, 2025 1:21 PM

views 33

मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

११ व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भेटीदरम्यान गोयल ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ यांच्याशी चर्चा करतील. उभय देशांचे मंत्री व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक आर्...

January 27, 2025 9:34 AM

views 55

महाकुंभमेळा क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित

येत्या २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेला क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं...