January 27, 2025 8:09 PM

views 36

केंद्र सरकारकडून वेव्ह बाजार, वेव्ह पुरस्कार आणि वा उस्ताद चॅलेंजची घोषणा

माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वेव्ज बाजार’, तसंच ‘वा उस्ताद चॅलेंज आणि वेव्ज पुरस्कार’चा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी ‘वेव्ज २०२५’ चा एक भाग म्हणून ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज सिजन- वन’ साठी जागतिक सहभागाच्या निम...

January 27, 2025 8:09 PM

views 21

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आज डेहराडून इथं या कायद्यासंबंधीचे नियम आणि इतर माहिती देणाऱ्या पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी स्वतःची नोंदणी त्यांनी या पोर्टलवर केली. विवाह, घटस्फोट, वारसाह...

January 27, 2025 7:25 PM

views 42

फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता

पुण्यातल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन तसेच रहिवाशांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं आता स्मारक ...

January 27, 2025 7:19 PM

views 544

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि स्मृती मानधनाला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०२४करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं जाहीर केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट कसोटीपटू तर महिला क्रिकेटमधे डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला एकदिवसीय सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.   पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेट...

January 27, 2025 7:15 PM

views 127

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा, प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार, यावेळी ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिकमध्ये गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण केलं ...

January 27, 2025 7:11 PM

views 47

पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातल्या नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्यानं तपासणी, रिअल टाईम मॉनिटिरिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस ...

January 27, 2025 7:08 PM

views 48

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या ७ सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे.    या आजाराची...

January 27, 2025 7:06 PM

views 58

शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण

जागतिक परिस्थितीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्सनं ७६ हजार आणि निफ्टीनं २३ हजारांच्या महत्त्वाच्या पातळीखाली बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ८२४ अंकांनी घसरुन ७५ हजार ३६६ अंकांवर बंद झाला. निफ्टी २६३ अंकांनी कोसळून २२ हजार ८२९ अंकांवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रा...

January 27, 2025 6:58 PM

views 12

एस.टी भाडेवाढ रद्द करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं.  हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहर, कळमनुरी, औंढा नागनाथ इथं  झालेल्या आंदोलनामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातली वाहतूक ठप्प होती.  नांदेडमध...

January 27, 2025 6:46 PM

views 12

दहावी आणि बारावी सीबीएसई परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या दरम्यान, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे परीक्षेदरम्यान मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळलं तर पुढची दोन वर्षं परीक्षेला बसायला बंदी घालण्यात येणार आहे.   पूर्वी अशा प्रकरणां...