January 30, 2025 7:13 PM

views 72

यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठकही आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षातल्या 659 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली. जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेला कुठल्याही विभागाचा निधी शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घ्या, या निधीतून होणारी कामे दर्ज...

January 30, 2025 7:07 PM

views 92

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या १ हजार १९ कोटी ३३ लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता

सोलापूर जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या १ हजार १९ कोटी ३३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं आज  मान्यता दिली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली.    जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना ८६१ कोटी...

January 30, 2025 7:04 PM

views 56

मनोज जरांगे यांचं सहाव्या दिवशी उपोषण स्थगित

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केलं. शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू करण्यात  येईल, मराठा  आरक्षण आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची तपासणी करून गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, कुणबी प्रमाणपत्र ...

January 30, 2025 7:00 PM

views 36

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू आहे. महत्वाच्या पक्षांचे मोठे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, रोड शो, आणि रॅली काढत आहेत.    भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोहिणी आणि वझिरपूर  भागात प्रचारसभांना संबोधित केलं. भाजपा सत्तेवर आल्यावर महि...

January 30, 2025 8:08 PM

views 68

दहावी आणि बारावी केंद्रावर गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

फेब्रुवारी-मार्च मधे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियु...

January 30, 2025 8:08 PM

views 44

लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं MPSC चं स्पष्टीकरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून उमेदवारांनी अपवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयोगाच्या सचिव  डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या नवी मुंबई इथं पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी २ फेब्रुवारी ला   'महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व प...

January 30, 2025 6:48 PM

views 40

एआय धोरण २०२५ च्या टास्कफोर्स समितीची पहिली बैठक संपन्न

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित एआय धोरण २०२५ च्या टास्कफोर्स समितीची पहिली बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. या बैठकीत अॅटलास स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर आणि मैत्री, एच डी एफ सी, गुगल, ...

January 30, 2025 8:24 PM

views 35

येत्या काही महिन्यात देशाची स्वतःची एआय प्रणाली विकसित होईल- अश्विनी वैष्णव

भारत येत्या काही वर्षांत स्वतःची एआय प्रणाली विकसित करेल, असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वक्त केला. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वैष्णव म्हणाले की, भारताने विकसित केलेलं हे तंत्रज्ञान जगातल्या सर्वोत्तम एआय तंत्रज्ञानाशी स्पर्धा करू शके...

January 30, 2025 6:44 PM

views 33

चंदीगढच्या महापौर म्हणून भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला विजयी

भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला या काँग्रेस आणि आपच्या आघाडीच्या उमेदवार प्रेमलता यांचा पराभव करुन  चंदीगढच्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत.  हरप्रीत कौर यांना एकोणीस मत मिळाली तर प्रेमलता यांना सतरा मतं मिळाली. काँग्रेस आप आघाडीच्या तीन नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराच्या बाजूने मत दिलं.

January 30, 2025 5:59 PM

views 45

सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रभादेवी इथल्या सहा समूह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी  केली. तसंच दादर, माहिम आणि प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकासासंदर्भात आढावा कार्यक्रमाला संबोधित केलं. सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु अशी खात्री शिंदे यांनी याव...