February 9, 2025 1:32 PM

views 77

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

भारत आणि इंग्लंड  यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कटक मधे बाराबती इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारत १-० नं आघाडीवर आहे.

February 9, 2025 1:31 PM

views 42

नवी दिल्लीत ५२व्या जागतिक पुस्तक मेळाव्याची आज सांगता

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरु असलेल्या ५२ व्या जागतिक पुस्तक मेळाव्याची आज सांगता होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मेळाव्याचं उदघाटन झालं होतं. शैक्षणिक पुस्तकांपासून आत्मचरित्र आणि कादंबऱ्या अशी विपुल साहित्य संपदा असलेला हा मेळावा राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि भारत व्यापार प्रोत्...

February 9, 2025 7:24 PM

views 41

नागरी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ १८ फेब्रुवारीपर्यंत

केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय, अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत १९ ते २५ फेब्रुवारी  पर्यंत असणार आहे.   यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुव...

February 9, 2025 1:16 PM

views 61

गुजरात मधे वाळू डंपर अंगावर पडल्यानं ३ महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात वाळू घेऊन जाणारा डंपर अंगावर पडल्यानं तीन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला. इथं रस्त्याचं काम सुरू असताना एका अरुंद वाटेवरून जाण्याच्या प्रयत्नात असलेला डंपर उलटला आणि काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला. यात मृत्युमुखी पडलेल्यांना क्रेन आणि बुलडोझरनं बाहेर काढून ...

February 9, 2025 1:13 PM

views 49

मध्यप्रदेशातील अपघातात ३ जणांचा मृत्यू , दहा जण जखमी

मध्यप्रदेशातल्या सतना इथं आज पहाटे झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मिनी ट्रक भाविकांना प्रयागराज इथं कुंभमेळ्याला घेऊन जात होती.   अपघात झाल्यानंतर सतना - चित्रकुट रस्त्यावर  बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असल्य...

February 9, 2025 1:09 PM

views 50

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे देशाच्या आर्थिक विकासाचे 3 महत्त्वपूर्ण पैलू- नितीन गडकरी

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे तीन स्तंभ देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असून या माध्यमातून आलेली गुंतवणूक उद्योगव्यवसायांना समृद्ध करु शकते, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं झालेल्या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेत ते काल बोलत होते.   आर्थिक वाढीस...

February 9, 2025 1:06 PM

views 16

पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद मुंबईत होणार

पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच ‘वेव्हज्’ भारताला आशयनिर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणेल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. सर्जनशीलतेचे शक्तीपीठ बनण्याच्या दृष्टीने भारतात पाया रचला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.   वेव्हज् परिषदेच्या न...

February 9, 2025 1:02 PM

views 42

यमुना नदीकाठाचा विकास करण्याला आपल्या पक्षाचं प्राधान्य असेल – परवेश वर्मा

यमुना नदीकाठाचा विकास करण्याला आपल्या पक्षाचं प्राधान्य असेल, असं आश्वासन भाजपचे नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार परवेश वर्मा यांनी आज दिलं.   दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर परवेश वर्मा यांनी मुंडका या मूळ गावी जाऊन त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री साहेब सिंह ...

February 9, 2025 12:54 PM

views 20

प्रधानमंत्री सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांसोबतची धोरणात्मक, आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी आणखी बळकट करणं यावर त्यांच्या या दौऱ्यात मुख्य भर असणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री १० ते १२ फेब्र...

February 9, 2025 10:49 AM

views 13

जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रात 6 नोंदणीकृत सुविधा केंद्रांना मान्यता

वाहन स्क्रॅपिंग धोरणाचा एक भाग म्हणून, जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रात सहा नोंदणीकृत सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.   या केंद्रांच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या वाहनधारकांना नवीन वाहन खरेदी करताना एकंदर करात 10 टक्के सवलत मिळणार असल्याचं परिवहन विभागाने म्हटलं आहे. &nbsp...