February 10, 2025 9:53 AM

views 36

भारत आणि इजिप्त दरम्यान आजपासून”Cyclone 2025″ या संरक्षण सरावाचं आयोजन

भारत आणि इजिप्त दरम्यान आजपासून 23 फेब्रुवारीपर्यंत "Cyclone 2025" या एकत्रित संरक्षण सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज इथं वाळवंटी प्रदेशात संरक्षण व्यावसायिक कौशल्यं, विशेष संरक्षण दलाची आंतरसंक्रियाशीलता यावर हा सराव केला जाईल

February 10, 2025 9:49 AM

views 45

नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायलच्या संरक्षण दलाची माघार

गाझापट्टीतील नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायली संरक्षण दलानं माघार घेतली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युध्दबंदीच्या पार्श्वभूमी ही दलं मागे फिरली आहेत. दरम्यान या भागात सामान्य नागरिकांना स्थिरावण्याच्या उद्देशानं पॅलेस्टिनी पोलीसांनी या भागाचा ताबा घेतला आहे.

February 10, 2025 9:02 AM

views 52

छत्तीसगढमध्ये 31 नक्षलवादी ठार

छत्तीसगढमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत काल 31 नक्षलवादी ठार झाले आणि 2 जवान शहीद झाले. बीजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर यांच्...

February 10, 2025 8:52 AM

views 38

मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा

मणिपूरमधील राजकीय अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना सुपूर्द केला. 2017 मध्ये मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून ते भाजप सरकारचे नेतृत्व करत आहेत. एन. बिरेन सिंह भाजप ईशान्य ...

February 9, 2025 8:01 PM

views 66

गाझाप्रश्नी इस्लामिक सहकार्य संघटनेनं तातडीच्या बैठकीची इराणची मागणी 

गाझाप्रश्नी इस्लामिक सहकार्य संघटनेनं तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी  इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अर्गाची यांनी केली आहे. इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देलत्ती यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरुनन याबाबत चर्चा केली आणि पॅलेस्टीनींच्या हक्काबद्दल या दोन्ही देशांचं एकमत असल्याची खात्री केली.    ...

February 9, 2025 8:01 PM

views 45

युध्दविरामासाठी गाझाच्या मुख्य भागातून इस्त्रायली फोजांची माघार सुरु

हमास आणि इस्रायलमधल्या युध्दविरामाचा भाग म्हणून गाझाच्या  मुख्य भागातून इस्त्रायली फौजेच्या तुकड्या आजपासून परतायला लागल्या आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना या युध्दविरामाच्या करारानुसार आपण पावलं उचलत असलो तरी या कराराची पुढची वाटचाल ही दोन्ही बाजूंवर अवलंबून  असल्याचं नमूद केलं. युद्धव...

February 9, 2025 7:52 PM

views 14

डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे शेकडो कोटी रुपयांची बचत – मुख्यमंत्री

राज्यानं तयार केलेल्या डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे अल्पावधीतच शेकडो कोटी रुपयांची बचत झाली असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूर इथं सायबर हॅक कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. या समर्पित व्यासपीठानं सायबर धोक्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली असून इतर राज्य या प्रणालीचं अ...

February 9, 2025 7:48 PM

views 42

ठाण्यातल्या चालक-वाहकांसाठीच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ठाण्यातल्या खोपट बसस्थानकावरच्या चालक वाहकांसाठीच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. या विश्रांतीगृहाचं रोल मॉडेल राज्यभरात राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. एस्टी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच इश्वर सेवा असं मानून काम करावं, असं सांगत शिंदे यांन...

February 9, 2025 7:44 PM

views 35

प्रधानमंत्री उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांशी आर्थिक, तंत्रज्ञानात्मक आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करणं हा या दौऱ्याचा हेतू आहे. १० ते १२ फेब्रुवारी रोजी ते फ्रान्समधे कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत उपस्थित राहतील, तसंच अनेक द्विपक्षीय चर्चांमध...

February 9, 2025 7:42 PM

views 32

आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन

सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्या तर सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं 'आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५' च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि ...