December 9, 2025 9:41 AM

views 195

श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इ...

December 9, 2025 9:25 AM

views 81

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि दक्षिणआफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथल्या बाराबती मैदानावर खेळण्यात येणार आहे.   यामालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगडमधील मुल्लानपूर इथं तर तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा ...

December 8, 2025 8:21 PM

views 47

दूरदर्शनच्या ‘सुप्रभातम’ कार्यक्रमाची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘सुप्रभातम’ या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. योगापासून भारतीय जीवनशैलीपर्यंत विविध पैलूवर चर्चा घडवून आणणारा हा कार्यक्रम रोजची सकाळ तजेलदार बनवतो, असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ‘सुप्रभातम’ हा अर्ध्या तासाच...

December 8, 2025 8:16 PM

views 74

पक्षाच्या घटनेची अद्ययावत प्रत सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेची अद्ययावत प्रत ३० दिवसांच्या आत सादर करावी, अशी सूचना निवडणूक आयोगानं आज केली. पक्षांची उद्दिष्टं आणि लोकशाही पद्धतीनं चालण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहिती देणारा हा दस्तावेज महत्त्वाचा असून तो जमा करणं सर्व राजकीय पक्षांना बंधनकारक आहे, असं आयोगानं प...

December 8, 2025 8:00 PM

views 58

आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयकाला संसदेची मंजुरी

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयक, २०२५' या विधेयकाला आज संसदेची मंजुरी मिळाली. चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेत परत पाठवलं. गेल्याच आठवड्यात या विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली होती. हा उपकर अनुचित वस्तूंवरच लागू होणार असून याचं स्वरुप, उत्पादन शुल्क प्रकारचं नसेल, असं केंद्...

December 8, 2025 7:16 PM

views 42

आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुणे विद्यापीठ प्रथम

नांदेडमधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तर उपविजेतेपद मुंबई विद्यपीठानं पटकावलं. स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभा...

December 8, 2025 7:13 PM

views 76

शेअर बाजारात जोरदार नफा वसुली

नफावसुली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढाव्याच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार साशंक आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स ६१० अंकांची घट नोंदवून ८५ हजार १०३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २२६ अंकांनी घसरुन २५ हजार ९६१ अं...

December 8, 2025 8:19 PM

views 234

IndiGo: विमानांची तिकीटं रद्द, प्रवाशांचे ८२७ कोटी रुपये परत !

१ ते ७ डिसेंबर या कालावधीत विमानांची सुमारे ६ लाख तिकिटं रद्द झाली आहेत. या प्रवाशांचे ८२७ कोटी रुपये परत केल्याची माहिती इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीनं दिली आहे. सोमवारी कंपनीनं सुमारे १८०० उड्डाणं केली आणि त्यातली ९१ टक्के वेळेवर होती, असं कंपनीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. ९ हजार बॅगांपैकी साडे...

December 8, 2025 3:56 PM

views 63

ड्रॅगन बोट स्पर्धेत वैष्णवी घरजाळे हिला सुवर्णपदक

नांदेड इथं नुकत्याच झालेल्या बाराव्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत लातूरमधल्या एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी घरजाळे हिने सुवर्णपदक पटकावलं.   या आधी तिने २०२२ साली थायलंडमध्ये  झालेल्या चौदाव्या एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक  मिळवलं होतं. या यशा...

December 8, 2025 3:39 PM

views 39

इंडिगो विमानांच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर  विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि डीजीसीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते मुंबईत आज वार्ताहर परिषदेत बोलत हो...