July 3, 2025 3:21 PM

views 20

युरोपातल्या बहुतांश देशांमध्ये उष्मा आणि अवर्षण हवामान

युरोपातल्या बहुतांश देशांमध्ये अतिरिक्त उष्मा आणि अवर्षण यासारखे हवामानबदलाचे परिणाम दिसून येत आहेत. बऱ्याच ठिकाणी वाढत्या तापमानामुळे वणवे लागत आहेत परिणामी वनसंपदा आणि प्राण्यांचे जीव धोक्यात येत आहेत.    जर्मनीत वर्षभरातल्या सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदवलेल्या दिवशी तापमान जवळपास ४० अंश सेल्...

July 3, 2025 3:06 PM

views 21

इंडोनेशियात प्रवासी जहाजाच्या अपघातात चौघांचा मृत्यू

इंडोनेशियात बाली जवळच्या समुद्रात एका प्रवासी जहाजाला झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून इतर ३८ जण बेपत्ता झाले आहेत. या जहाजातून २३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. केएम टुनु प्रतामा नावाचे हे लाकडी जहाज केटापांग बंदरातून जावाच्या पूर्वेकडच्या बेन्यूवांगी कडे जात असताना हे जहाज बुडाल...

July 3, 2025 2:55 PM

views 14

केंद्र सरकारला शेतकऱ्यांची पर्वा नाही- राहुल गांधी

 महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे ७६७ कुटुंबं उद्ध्वस्त झाली असून, यानंतरही केंद्र सरकारला त्यांची पर्वा नाही, शेतकरी दररोज कर्जाच्या ओझ्याखाली दडपला जात असूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. राज्याचे मुख्यम...

July 3, 2025 2:43 PM

views 49

अमरनाथ यात्रेला सुरूवात

अमरनाथ यात्रेला सुरूवात झाली असून दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल या दोन्ही मार्गांवरून कडक सुरक्षेत यात्रेकरू रवाना झाले.   २६८ वाहनांमधून यात्रेकरू रवाना झाले असून यापैकी १ हजार ९९३ यात्रेकरू बालटालला आणि ३ हजार २५३ यात्रेकरू पह...

July 3, 2025 2:38 PM

views 33

पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घाटन

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज हरियाणाच्या मानेसार इथं पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घघाटन केलं. या परिषदेला सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशाचे अध्यक्ष उपस्थित होते.   दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्दिष्ट राष्ट्र निर्माण आणि संवि...

July 3, 2025 1:34 PM

views 43

विधानसभा : कर्करोगनिदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाला. कर्करोग निदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. या आरोपांची आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून चौकशी केल...

July 3, 2025 1:25 PM

views 73

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना इथल्या संसदेत भाषण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी घाना इथल्या संसदेत भाषण करणार असून अक्रा इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.   अक्रा इथल्या एनक्रुमा स्मारकालाही ते भेट देणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी घा...

July 3, 2025 1:08 PM

views 46

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात पहिले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण यासह त्यांचे विविध कार्यक्रम उद्या, शुक्रवारी नियोजित आहेत.

July 3, 2025 1:02 PM

views 59

कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

     कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. गैर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेने घेऊ नये असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. येत्या आर्थिक वर्षापासून यासंदर्भातले दिशा निर्देश लागू होणार आहेत. ...

July 3, 2025 1:01 PM

views 23

भारत सरकारकडून पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या समाज माध्यमांवर बंदी

भारत सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या समाज माध्यमांवर बंदी घातली आहे. यापूर्वी मे महिन्यात भारतविरोधी प्रचार आणि प्रक्षोभक माहिती पसरवल्याबद्दल अनेक पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्या आणि समाज माध्यमं यांच्यावर भारत सरकारने बंदी घातली होती.   यात अभिनेत्री सबा कमर, अहद रझा मीर...