July 11, 2025 1:18 PM

views 31

हैदराबादमध्ये बनावट मद्य प्राशन केल्यामुळं ७ जणांचा मृत्यू

हैदराबादच्या कुकटपल्ली भागात बनावट मद्य पिल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सात झाली आहे, बाधितांपैकी दोघांचा काल रात्री  मृत्यू झाला. आतापर्यंत ५१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं  आहे. कुकटपल्ली आणि आसपासच्या परिसरात ६ आणि ७ जुलै ला हे मद्य पिलेल्या लोकांना कमी रक्तदाब, चक्कर येणे आणि थ...

July 11, 2025 1:37 PM

views 16

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतले शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास १४ जुलैला सुरू होणार

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतील भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लासह इतर तीन सदस्यांचा परतीचा प्रवास १४ जुलै रोजी सुरू होणार असल्याचं नासानं जाहीर केलं आहे. हे यान पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरवण्यात येईल. ग्रुप कॅप्टन शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १४ दिवसांच्या मोहिमेवर ...

July 11, 2025 12:56 PM

views 48

अंमली पदार्थ प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी कुब्बावाला मुस्तफा याला भारतात आणण्यामध्ये यश

  अंमली पदार्थ प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी कुब्बावाला मुस्तफा याला संयुक्त अरब अमिरातहुन भारतात आणण्यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ला  यश आलं आहे.   सांगली इथं परदेशातून सिंथेटिक ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी चालवल्याचा आरोप मुस्तफावर आहे. कुब्बावाला मुस्तफा आणि इतरांशी ...

July 11, 2025 12:44 PM

views 26

पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात नऊ प्रवाश्यांची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात काल संध्याकाळी अज्ञात  बंदूकधारींनी नऊ बस प्रवाश्यांची गोळ्या घालून  हत्या केली.  हे प्रवासी पूर्व पंजाब प्रांतातून येत असल्याची ओळख पटवून बस मधून त्यांचं  अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.   अदयाप कोणत्याही दहशतवादी गटाने या घटनेची जबाबदारी  स्वीकारली नस...

July 11, 2025 11:18 AM

views 20

जपानने अमेरिकेवरील अवलंबित्व संपवावे – शिगेरू इशिबा

येत्या तीन आठवड्यात अमेरिकेकडून शुल्क आकारण्याच्या भीतीमुळे जपानने सुरक्षा, अन्न आणि ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेवरील अवलंबित्व संपवावे असे जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनी म्हटले आहे.    अमेरिकेच्या शुल्क धोरणाचे अनुसरण करण्याऐवजी जपानने सुरक्षा, ऊर्जा आणि अन्न क्ष...

July 11, 2025 10:35 AM

views 45

फिडे महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत 4 भारतीय खेळाडूंचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

जॉर्जियामध्ये बातुमी इथं फिडे महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चार भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सर्वोच्च मानांकित ग्रँडमास्टर कोनेरु हंपी, द्रोणवल्ली हरिका, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी आपलं आव्हान राखलं आहे.

July 11, 2025 10:14 AM

views 38

जम्मू आणि काश्मीर: पूंछ जिल्ह्यात दहशतवादी अड्डा उध्वस्त

जम्मू आणि काश्मीरमध्ये, लष्कराच्या रोमियो फोर्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्तपणे केलेल्या मोहिमेत, काल पूंछ जिल्ह्यात एक दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली.   प्रदेशातील शा...

July 11, 2025 10:09 AM

views 36

निपा विषाणूबाबत अभ्यास करण्यासाठी

केरळमधील पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील निपा विषाणूबाबत अभ्यास करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय संसर्गजन्यरोगशास्त्र संस्थेसह राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे शास्त्रज्ञ तिथं दौरा करत आहेत. दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात एनआयवीचं पथक या जिल्ह्यातील वटवाघुळांचं सर्वेक्षण करेल. सध्या केरळमध्ये अंदाजे पा...

July 11, 2025 9:55 AM

views 48

अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू

काश्मीरच्या खोऱ्यात अधून मधून सुरू असलेल्या पावसातही अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ४५ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असून काल १७ हजारांहून अधिक यात्रेकरूंनी दर्शन घेतले. ही यात्रा ९ ऑगस्ट पर्यन्त चालेल.

July 11, 2025 9:51 AM

views 41

कावड यात्रेला आजपासून सुरुवात

उत्तर भारतात, पवित्र श्रावण महिन्यात होणाऱ्या वार्षिक कावड यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या तीर्थयात्रेदरम्यान, लाखो भाविक गंगा नदीचे पवित्र जल गोळा करण्यासाठी उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या पवित्र स्थळांना जातात. या यात्रेकरूंच्या व्यवस्थापनासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्...