July 15, 2025 1:30 PM

views 39

आज जागतिक युवा कौशल्य दिन

जागतिक युवा कौशल्य दिन आज साजरा केला जात असून स्किल इंडिया उपक्रमाचं भारताचं हे दहावं वर्ष आहे. प्रधानमंत्र्यांनी २०१५ मध्ये हा उपक्रम सुरू केला. तरूणांना रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेसाठी उद्योगाशी संबधित कौशल्यांनी सुसज्ज करण या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. यंदाची संकल्पना कृत्रिम बुद्धिम...

July 15, 2025 1:26 PM

views 10

जीवाश्मेतर इंधनातून ५० टक्के वीजनिर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या 5 वर्ष आधी पूर्ण

भारतानं ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात नवीन टप्पा पूर्ण केला आहे. जीवाश्मेतर इंधनातून वीजनिर्मितीचं ५० टक्के उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्ष आधीच पूर्ण झालं आहे. भारताची एकूण वीजनिर्मिती क्षमता ४८४ गिगावॅट असून, त्यापैकी २४२ गिगावॅट वीजनिर्मिती सध्या जीवाश्मेतर इंधनाच्या माध्यमातून होत आहे. &nbsp...

July 15, 2025 1:18 PM

views 18

केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार

प्रधानमंत्री कुसुम योजनेला राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात मिळालेल्या यशानंतर आता केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची घोषणा नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. ते आज आयआयटी मुंबई इथे आयव्हीसीए नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते...

July 15, 2025 1:10 PM

views 43

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष  शी जिनपिंग आणि एससीओ, अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्यांची  भेट घेतली. डॉ. जयशंकर आपल्या  दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी काल बीजिंग मध्ये  पोहोचले.   ते आज तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्...

July 15, 2025 1:05 PM

views 17

रशियातून इंधन, गॅस आणि युरेनियम आयात करणाऱ्या देशांवर 100% वाढीव आयातशुल्क लादण्याचा ट्रंप यांचा इशारा

जे देश रशियातून इंधन, गॅस आणि युरेनियम आयात करतात त्यांच्यावर शंभर टक्के वाढीव आयातशुल्क लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. रशिया युक्रेनबरोबरचं युद्ध संपवण्यात अपयशी ठरत असल्यानं आपण नाखूश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी काल व्हाईट...

July 15, 2025 12:49 PM

views 30

पंजाबचे ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं अपघातात निधन

पंजाबचे ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं जालंधर जिल्ह्यातल्या बियास गावी एका रस्ता दुर्घटनेत निधन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवरून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.   ते त्यांच्या फिटनेसमुळे तरूणांसाठी नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व राहिले आहेत. ते खिलाडू ...

July 15, 2025 12:44 PM

views 44

अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा काश्मीर खोऱ्याकडे रवाना

जम्मू मध्ये भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प वरून आज सकाळी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला.   यापैकी २ हजार ५०१ यात्रेकरू बालताल  मार्गे, तर ३ हजार ८८७ यात्रेकरू पहलगाम मार्गे अमरनाथ गुंफांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतील.

July 15, 2025 12:41 PM

views 63

प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

ओडिशातल्या बालासोर मध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींनं प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला. 95 टक्के जळलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेऊन या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. पोलिसां...

July 15, 2025 12:37 PM

views 63

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर असून आज त्या कटक इथं रवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत तसंच रवेनशॉ कन्याशाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करणार आहेत.   15 व्या शतकातले महान ओडिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंती निमित्त आय...

July 15, 2025 9:52 AM

views 16

टोरंटोमध्ये रथ यात्रेदरम्यान झालेल्या विघातक कृत्याचा भारताकडून तीव्र निषेध

कॅनडामधल्या टोरंटोमध्ये रथ यात्रेदरम्यान झालेल्या विघातक कृत्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती भारतानं कॅनडाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.   या रथ यात्रेत झालेल्या विघातक कृत्यांच्या अहवालांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती परराष्ट्र ...