December 13, 2025 8:57 PM

views 615

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई-केवायसीमध्ये ३१ डिसेंबरपूर्वी एकदा दुरुस्ती करता येणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी एकच संधी मिळणार असून त्यांनी ती प्रक्रिया ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. या योजनेच्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातल्या असल्यानं ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही चूक होणं स्वाभ...

December 13, 2025 8:56 PM

views 56

कोलकात्यातल्या सॉल्ट लेक कार्यक्रमाच्या आयोजकाला अटक

दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर पुन्हा भारतभेटीवर आला आहे. गोट इंडिया टूर या खासगी दौऱ्याच्या निमित्तानं तो आज पहाटे कोलकात्यात दाखल झाला.  कोलकात्यातल्या सॉल्ट लेक मैदानावर  हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मेस्सीनं चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं. पण तो तिथे काह...

December 13, 2025 8:44 PM

views 56

ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआची अंतिम फेरीत धडक

ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआ या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारल्यानं भारताचं सुवर्णपदक निश्चित झालं आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात उन्नती हिनं तसनीम मीर हिच्यावर १८-२१, २१-१६, २१-१६ असा विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात इशाराणीनं तन्वी हिरेमठ हिच्यावर १८-२१,...

December 13, 2025 8:37 PM

views 28

शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी आता १५ जानेवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील-चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी आता १५ जानेवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. ​आमदार विक्रम पाचपुते यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ई-पीक पाहणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी करू शकले नाहीत, ई...

December 13, 2025 8:34 PM

views 245

केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएचा तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर विजय

केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत १०१ पैकी ५० जागा जिंकून विजय मिळवला आहे. त्यासोबतच इतर ठिकाणीही एनडीएनं चांगली कामगिरी केली आहे. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातल्या लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंटला गेल...

December 13, 2025 8:27 PM

views 37

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासह घरांचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातले अनेक निर्णय

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शहरात सतरा ठिकाणी समूह पुनर्विकास  योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. यासह एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ, म्हाडाच्या ओसीसीसाठीच्या अभय योजनेला एक वर्षाची मुदतवाढ तसंच एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्या...

December 13, 2025 8:26 PM

views 17

राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासह विविध मुद्दे विधीमंडळात विरोधकांकडून उपस्थित

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृषी क्षेत्रातल्या निधीचा अपव्यय, राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, वाढती गुन्हेगारी इत्यादी मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते आज विधानसभेत बोलत होते. अतिवृष्टीचा फटका बसलेल्य...

December 13, 2025 8:14 PM

views 38

डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्यानंतरही थायलंड-कंबोडिया चकमकी सुरु

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्यानंतरही थायलंड आणि कंबोडिया दरम्यान चकमकी सुरु आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांमधे शस्त्रसंधीकरण्यावर सहमती झाली असल्याचं ट्रंप यांनी जाहीर केलं होतं. मात्र कोणताही शस्त्रसंधी झालेला नाही असं थायलंड सरकारने स्पष्ट केलं आहे. तर कंबोडियाने अद्याप प्रति...

December 13, 2025 8:12 PM

views 68

दिव्यांग अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ

दिव्यांग व्यक्तींना सामजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिव्यांग- अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुदानाच्या रकमेत त राज्यशासनाने वाढ केली आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधिमंडळात ही माहिती दिली. अशा जोडप्यांमधे एकजण दिव्यांग असल्यास दीड लाख रुपये, तर दोन्ही जोडीदार दिव्यांग असल्...

December 13, 2025 8:14 PM

views 41

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते – अमित शहा

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधे बस्तर ऑलिंपिक्सच्या समारोप सोहळ्यात आज ते बोलत होते. येत्या ३१ मार्चपर्यंत देशातू न नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार...