December 14, 2025 2:56 PM

views 32

हमासच्या शस्त्रास्त्र निर्मिती विभागाचा प्रमुख ‘राद साद’ ठार

गाझा पट्टीत काल झालेल्या हल्ल्यात हमासच्या शस्त्रास्त्र निर्मिती विभागाचा प्रमुख ‘राद साद’ ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे. सादने हमासच्या सैन्य उभारणीचं नेतृत्वही केलं होतं. दोन वर्षांपूर्वी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी ‘साद’ हा एक होता. त्याच्यामुळेच गाझामध्य...

December 14, 2025 2:21 PM

views 95

खगोलप्रेमींना रात्री आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत दृष्य  पाहायला मिळणार

खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत दृष्य  पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्कावर्षाव असून, रात्री सुमारे ९ वाजल्यापासून पहाटेपर्यंत दर तासाला १०० हून अधिक उल्का पडताना दिसू शकतात. हा उल्कावर्षाव मिथुन या तारकासमूहात होणार असल्यानं त्याला मिथुन उल्कावर्षाव असं नाव दे...

December 14, 2025 1:39 PM

views 59

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उद्यापासून दोन दिवस जॉर्डनच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,उद्यापासून दोन दिवस जॉर्डनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांचं हे ७५वं वर्ष आहे. जॉर्डनकडून मिळणाऱ्या फॉस्फेटपासून भारतातल्या कृषी क्षेत्राला मिळणारी ऊर्जा, तसंच दोन्ही देशांमधले जवळचे सांस्कृतिक धागे यांच्या आधारावर दोन्ही देशांमधले संब...

December 14, 2025 11:43 AM

views 34

हस्तकला उद्योगाची निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची अपेक्षा

हस्तकला उद्योगातून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची निर्यात होते आणि लवकरच ही निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत 'क्राफ्टेड फॉर द फ्युचर' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. आज...

December 14, 2025 2:10 PM

views 73

पुणे पुस्तक महोत्सवाचा आरंभ

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, संयोजक राजेश पांडे, प्रसिद्...

December 14, 2025 9:37 AM

views 42

दिल्लीच्या एम्समध्ये पक्षाघातावरील सुपरनोवा स्टेंटची चाचणी

नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पक्षाघातावरील 'सुपरनोव्हा स्टेंट' नावाच्या नवीन आणि प्रगत उपचार उपकरणाची भारताची पहिली चिकित्सालयीन चाचणी घेतली आहे. सुपरनोव्हा स्टेंट देशातील विविध प्रकारच्या रुग्णांसाठी तयार केला आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी वयाच्या रुग्णांनाही अनेकदा पक्षाघ...

December 14, 2025 1:35 PM

views 139

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना धरमशाला इथं रंगणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

December 14, 2025 9:00 AM

views 31

पुण्यानजिक जुन्नर वन विभागात वाढलेला बिबटयांचा वावर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना

पुण्यानजिक जुन्नर वन विभागात वाढलेला बिबटयांचा वावर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. त्याअंतर्गत पिंजऱ्यांच्या मदतीनं आतापर्यंत 68 बिबटे वन विभागानं पकडले आहेत. उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांच्या विशेष प्रयत्नांचं हे यश असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यां...

December 13, 2025 9:03 PM

views 39

वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा रेल्वेमंत्र्यांच्या सूचना

वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा सूचना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्या. IRCTC च्या वेबसाइटवर खाती उघडण्यासाठी कठोर पडताळणी सुरू केल्यापासून नव्या खात्यांची संख्या दैनंदिन १ लाखावरुन ५ हजारापर्यंत कमी झाल्याचं ते म्हणाले. ३ कोटींपेक्षा अधिक बनावट खाती बंद केली ...

December 13, 2025 9:01 PM

views 80

स्टेट बँकेची मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात

स्टेट बँकेनं मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यामुळं बँकेचा रेपो दराशी संलग्न व्याजदर ७ पूर्णांक ९ दशांश टक्के होईल. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील. यामुळं गृह, वाहन आणि इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसंच मुदत ठेवींवरचे व्याज दरही कमी होतील. इंडियन ओव्हरसीज बँकेनंही रेपो संलग्न व...