December 20, 2025 7:17 PM

views 1.9K

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताचा संघ जाहीर

आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं असून उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे असेल. या संघाची घोषणा आज बीसीसीआयनं केली. इशान किशन आणि रिंकू सिंह यांनी संघात पुनरागमन केलं आहे. सलामीचे फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची नावं नक्की झालं आहे. य...

December 20, 2025 7:06 PM

views 71

माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन

राज्याच्या माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

December 20, 2025 6:50 PM

views 73

गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आसाम राज्यामध्ये आज विकासाच्या उत्सवाचा दिवस असून आसामच्या विकासात पुन्हा एकदा एक नवीन अध्याय जोडला जात आहे, तसंच हा केवळ आसामच नाही तर संपूर्ण ईशान्येच्या विकासाचा उत्सव आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुवाहाटी इथं एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गुवाहाटी इथल्य...

December 20, 2025 6:45 PM

views 45

ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाला फरक पडत नसल्याचा बावनकुळे यांचा दावा

ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाला काहीही फरक पडत नसल्याचा दावा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांन आज केला. अकोल्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांनीही चर्चेची तयारी दाखवली तर भाजप त्यासाठी तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नवाब मलिकांच्या नेतृत्...

December 20, 2025 6:36 PM

views 50

श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातले सर्वात मोठे आणि कुशल ‘मुत्सद्दी’ – एस. जयशंकर

विकसित भारताचं परराष्ट्र धोरण महत्त्वाकांक्षी, दीर्घकालीन आणि क्षितीज विस्तारणारं हवं अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठात दीक्षांत समारंभात ते बोलत होते.  जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल झाले असून अनेक नवी ...

December 20, 2025 7:49 PM

views 94

व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा

व्हॉट्सॲप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यामुळे व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा सीईआरटी या भारताच्या सायबर सुरक्षा संस्थेनं दिला आहे. या कमजोर दुव्याला ‘घोस्ट पेअरिंग’ असं नाव देऊन यासंदर्भात संस्थेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. व्हॉट्सॲपचं खातं ए...

December 20, 2025 6:27 PM

views 62

बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य-प्रधानमंत्री

भाजपाचं सरकार पश्चिम बंगाल मधल्या विविध क्षेत्रांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून बंगालचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम बंगाल मधल्या नादिया जिल्ह्यातल्या राणाघाट इथं सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महाम...

December 20, 2025 5:31 PM

views 60

बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा-अँटोनियो गुटेरेस

बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा, देशात उसळलेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा आणि हिंसाचारापासून दूर रहावं, असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे. युवा नेते शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येचा निषेध करत, गुटेरेस यांनी बांग्लादेशी अधिकाऱ्यांना आंतरराष्...

December 20, 2025 3:41 PM

views 57

गडचिरोलीतल्या २ नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोलीतल्या दिनेश गावडे खून प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सीपीआय माओवादी या बंदी असलेल्या संघटनेच्या दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य असल्याच्या संशयावरून गावडे याचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी एनआयएनं आणखी ४ जणांविरु...

December 20, 2025 3:38 PM

views 115

ज्येष्ठ अभिनेते श्रीनिवासन यांचं निधन

मल्याळी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवासन यांचं आज सकाळी कोची इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. १९७६ साली ‘मणीमुझक्कम’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रीनिवासन यांनी मोहनलाल आणि ममूठी सारख्या अभिनेत्यां सोबत अनेक चित्रपटा...