December 21, 2025 2:38 PM

views 41

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आसाममधे नामरूप इथं १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमीपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते नामरूप इथं १२ हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आसाम विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत असून दिब्रू गढ ज्या औद्योगिक प्रगतीची स्वप्न पाहत होता, तो अध्याय आत...

December 21, 2025 8:41 PM

views 109

महाराष्ट्रात २८८ नगरपरिषदांच्या आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु

राज्यातल्या २८८ नगरपरिषदांच्या आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची गर्दी आहे. बीडमधे मतमोजणीच्या वेळी गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार कराव...

December 21, 2025 1:46 PM

views 70

रेल्वेची भाडेवाढ येत्या २६ डिसेंबर पासून लागू होणार

रेल्वेने प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या २६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य  वर्गाच्या प्रवासाकरता प्रतिकिलोमीटर एक पैसा तर मेल - एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर २ पैसे भाडेवाढ...

December 21, 2025 1:30 PM

views 274

१९ वर्षांखालील क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून  प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय

भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालच्या मुलांच्या संघांमध्ये आज दुबई इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या डावाला वेगानं सुरुवात केली. भारतानंही चौथ्याच षटकात सलामीवीर हमझा याला बाद करत...

December 21, 2025 2:35 PM

views 80

देशाच्या उत्तर भागात धुक्याची दाट चादर

जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आज जोरदार हिमवर्षाव होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आज थंडीची लाट राहील असा अंदाज आहे.  दिल्ली, हरियाणा, बिहार, छत्तीसगड आणि चंदीगडच्या काही भागात आज दाट धुक्याचा थर राहील, तर ...

December 21, 2025 10:57 AM

views 123

आज दुसरा जागतिक ध्यान दिवस

जागतिक पातळीवर आज दुसरा ध्यान दिवस पाळण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने गेल्या वर्षी 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस घोषित केला. 21 डिसेंबरपासून उत्तरायणाला प्रारंभ होत असल्याने ही तारीख निवडण्यात आली होती. न्यूयॉर्कमध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संयुक्त राष्ट्र मुख्याल...

December 21, 2025 10:14 AM

views 39

नागरिकांना स्वभाषेत निकाल उपलब्ध होण्यासाठी संवैधानिक संस्थांनी संविधान भावनेने काम करावे – सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

न्यायिक प्रक्रिया आणि न्यायालयाचे निकाल नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये उपलब्ध होतील याची खातरजमा करण्यासाठी सर्वच संवैधानिक संस्थांनी संविधान भावनेने काम करावं असं मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील इटावा इथल्या हिंदी सेवा निधी ट्रस्टच्या 33 व...

December 21, 2025 10:03 AM

views 38

करुणा, सुसंवाद, परस्पर आदर ही मूल्ये बळकट, सुसंवादी आधुनिक जगाचा पाया असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

करुणा, सहिष्णुता, परस्पर आदर आणि सामूहिक जबाबदारी ही मूल्य भूतकाळातील नसून, बळकट आणि सुसंवादी आधुनिक जगासाठी आवश्यक असलेला पाया आहेत. असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. तेलंगणातील हैदराबाद इथं गाचीबोवली इथं झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विकसित भारताच्या दृष्टीकोनासाठी आ...

December 21, 2025 9:16 AM

views 72

BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला कांस्यपदक

बॅडमिंटनमध्ये, काल चीनमधील हांगझोऊ इथं झालेल्या BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 या स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं कास्यपदक मिळवलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुसऱ्यांदा पदकाची कामगिरी केली आहे. याप...

December 20, 2025 7:17 PM

views 41

भाजपा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

भारतीय जनता पक्ष सत्तेत राहण्यासाठी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात केला. भाजपा धर्माचं आणि भाषेचं राजकारण करत आहे, विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबत आहे, याच्या विरोधात नागरिकांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन त्यांन...