August 5, 2026 11:25 AM

printer

नीट युजी कौन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी आजपासून नोंदणी सुरू

वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्याक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट युजी कौन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे.

अधिकृत वेळापत्रकानुसार, नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून १२ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी  लागेल, असं या समितीनं कळवलं आहे.

समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत.