December 16, 2024 3:47 PM

views 49

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन, देशभरातून शोक व्यक्त

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसैन यांना ५ ग्रॅमी पुरस्कार मिळाले. तसंच, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातल्या नागरी सन्मानाचे ते मानकरी ठरले.    हुसैन यांच्या निधनामुळे संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे, त्यांना लाभलेली सर्जनशीलता आणि कल्प...