June 19, 2024 7:26 PM

views 59

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यात योग विद्या निकेतनचे कार्याध्यक्ष महेश सिनकर आणि प्रशिक्षक सुनील भुजबळ यांनी मार्गदर्शन करत योगासनांची प्रात्यक्षिकंही दाखवली.   [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/06/yoga.mp4"][/video]   सुनील भुजबळ यांची मुलाखत शुक्रवारी २१ जूनला सकाळी ११ वाजता एफ एम गोल्ड वरून तर महेश सिनकर यांची मुलाखत एफ एम रेनबोवर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होईल.

June 19, 2024 6:55 PM

views 59

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

येत्या शुक्रवारी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.    मुंबईतल्या कांदिवलीतल्या चारकोप मार्केट इथं शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता  होणाऱ्या  योगा ऑन स्ट्रीट या  कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी होणार आहेत. बोरिवलीतल्या कोरकेंद्र डोम, पोयसर जिमखाना संस्थेतर्फेही  इथंही योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.   पुण्यातही महापालिकेतर्फे शहरातील १३ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमांत...