December 11, 2024 7:30 PM

views 65

महिला क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ८३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये, आज पर्थ इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ८३ धावांनी विजय मिळवला.  भारतानं नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून २९८ धावा केल्या. एनाबेला सिदरलँडच्या ११० धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला ही मजल गाठता आली. भारतातर्फे रेड्डीनं चार, तर दीप्ती शर्मानं एक बळी मिळवला.    विजयासाठी २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सलामीच्या जोडीतली रिचा घोष ५ व्या षटकातच २...

December 11, 2024 10:51 AM

views 61

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान ५० षटकांचा महिला क्रिकेट संघाचा आज अंतिम सामना

महिला क्रिकेटमध्ये, पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघादरम्यान होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी पर्थमधील मैदानावर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत आधीच २-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यांनी पहिला सामना पाच गडी राखून आणि दुसरा सामना १२२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. हे दोन्ही सामने ब्रिस्बेन इथे झाले होते. ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया व्हॉल आतापर्यंत मालिकेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू असून तिने दोन सामन्यां...

December 5, 2024 3:36 PM

views 73

महिला क्रिकेट – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव

महिला क्रिकेटमधे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत, आज ब्रिस्ब्रेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ ३५ व्या षटकातच १०० धावा करुन गारद झाला. मेगन स्कट हिनं पाच बळी घेतले. तर किम गर्थ, ऍश्ले गार्डनर, ऍनाबेल सुदरलँड आणि ऍलेना किंग यांनी प्रत्येकी एकबळी मिळवला.   ऑस्ट्रेलियानं सतराव्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली. जॉर्जिया ओलच्या नाबाद ४६, आणि फिबी लिचफिल्डच्या ३५ धावांच्या बळाव...

October 29, 2024 8:08 PM

views 78

भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज महिला क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हीनं एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत, इंग्लंडच्या सोफी हीला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दीप्तीची ही कारकिर्दीतली सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही दीप्तीनं पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.  

October 29, 2024 7:34 PM

views 54

महिला क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे अहमदाबाद इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा सामन्यातला एक चेंडू बाकी असताना २३२ धावांवर आटोपला. ब्रुक हॅलिडेच्या ८६ धावांमुळे त्यांच्या धावसंख्येला आकार मिळाला. भारतातर्फे दीप्ती शर्मानं ३, प्रिया मिश्रानं २, तर सायमा ठाकूर आणि रेणुका सिंग यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.  शेवटची बातमी हाती आली तेव्हां, भारताच्या २४ षटकात २ बाद १०२ धावा झाल्या होत्या.  तीन सामन्यांच्या ...

October 29, 2024 1:42 PM

views 93

भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान अंतिम सामन्याला अहमदाबादमध्ये प्रारंभ

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आधीचे एक एक सामने जिंकून बरोबरी साधली असल्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील.  न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करायचा निर्णय घेतला आहे.

October 3, 2024 1:38 PM

views 53

महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजाह इथं सुरुवात

महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना बांग्लादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंडचा संघ यांच्यात होणार आहे . सामन्याला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आहेत. या स्पर्धेत मागील तिनही वेळा ऑस्ट्रेलियानं विजेतेपद मिळवलं असून भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. यंदा मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये ...