December 19, 2024 1:34 PM

views 60

हिवाळी अधिवेशन : संसदेच्या आवारात सत्ताधारी आणि विरोधकांचं निदर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. भाजपच्या सदस्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली. नेहरु- गांधी परिवाराने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बातमीदारांशी बोलताना केला.    दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यां बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विरोधी पक्षांनी संसदभवन परिसरात निदर्शनं केली. शाह यांनी माफी म...

December 18, 2024 3:15 PM

views 58

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर औचित्याचे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे नितिन राऊत यांनी उपस्थित केला. मंत्री आशीष शेलार यांनी त्याला हरकत घेऊन राज्यसभेतले विषय या सभागृहात घेता येणार नाही, असं सांगितलं.    मुंबईत झालेल्या विशेष अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबाबतची चर्चा विधानपरिषदेत पु...

December 17, 2024 1:50 PM

views 62

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन : विधानसभेत तालिका सद्यस्यांची नियुक्ती

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत तालिका सदस्य म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम आणि दिलीप सोपल यांची नियुक्ती केल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. सभागृहाचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दत्तात्रय राणे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव अध्यक्षांनी मांडला आणि तो मंजूर झाला. तत्पूर्वी, कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी परभणी आणि बीड इथल्या घटनांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेतही विरोधक या मु...

December 16, 2024 3:45 PM

views 60

विधानसभेत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहात ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.   पुरवणी मागण्यांमध्ये ३ हजार ५० कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री लाडकी ...

December 16, 2024 1:22 PM

views 65

मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं.  सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर चर्चा होणार असून  महानगरपालिका कायदा तसंच खाजगी विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे.  तसंच २०२४-२५ या वर्षासाठीचा १५ हजार कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्पही या पाच दिवसांच्या अधिवेशनात मांडला जाईल. 

December 16, 2024 3:06 PM

views 67

बीड हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यूप्रकरणविषयी मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.    त्यावर या संदर्भात चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं.  बीडमधील हत्या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसंच, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण...

December 16, 2024 9:38 AM

views 64

हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच, हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

December 15, 2024 8:41 PM

views 62

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाचा बहिष्कार

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला आहे.    महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज नागपुरात बैठक झाली, त्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते वेळी उपस्थित होते.  ...

December 10, 2024 1:51 PM

views 54

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवर गदारोळ होऊन आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. सभागृहाच्या सभ्यतेचे पालन केलं जावं,तसंच देशातल्या जनतेच्या आशाआकांक्षांचा आदर राखत काम केलं जावं, असं आवाहन त्यांनी विरोधी नेत्यांना केलं.     राज्यसभेतही असंच चित्र दिसून आलं. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला....

December 9, 2024 8:12 PM

views 63

गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत काँग्रेस, द्रमुकसह अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी लाचखोरी प्रकरणात घोषणाबाजी केली. या दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ वरच्या चर्चेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली. मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने लोकसभेचं कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.   राज्यसभे...