May 3, 2025 12:52 PM

views 79

अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार

पुढील महिन्यात १४ जून रोजी अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार आहे. काल व्हाईट हाऊस प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.  वॉशिंग्टन इथल्या नॅशनल मॉलमध्ये आय़ोजित एक दिवसाच्या कार्यक्रमात ६ हजार ६०० सैनिक, १५० लष्करी वाहनं आणि ५० विमानांचा सहभाग असणार आहे. पहिल्या महायुद्धाचा विजय दिन, असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं आहे. याच दिवशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस देखील आहे.

April 7, 2025 1:50 PM

views 63

अमेरिकेनं नवं कर लागू केल्यानंतर अनेक देशांचा व्हाईट हाऊसशी संपर्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवं कर धोरण लागू केल्यानंतर व्यापारविषयक चर्चा सुरू करण्यासाठी पन्नासहून अधिक देशांनी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला आहे. यामुळे गेल्या आठवड्यात शेअर्सचं मूल्य घसरल्यानं अमेरिकेचं सुमारे ६ ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं असलं  तरी ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शुल्काला आपला पाठिंबा कायम ठेवला आहे. गेल्या बुधवारच्या घोषणेनंतर ५० हून अधिक देशांनी अमेरिकेशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांनी व्यापारी चर्चेचा पाया म...

April 6, 2025 7:00 PM

views 49

पॉप गाण्याचा वापर करून ‘क्रूर’ हद्दपारीच्या व्हिडिओमुळे व्हाईट हाऊसवर टीका

अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या स्थलांतरितांना हद्दपारीसाठी तयार करत असतानाचा व्हिडीओ टाकल्यामुळे व्हाईट हाऊसवर टीका होत आहे. व्हाईट हाऊसने समाजमाध्यमावरच्या संदेशासोबत हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात बेड्या घातलेल्या स्थलांतरितांना विमानात चढवत असतानाचं चित्रीकरण आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर समाज माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा प्रकार अतिशय क्रूर आणि अमानवी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.