July 11, 2024 7:53 PM

views 57

कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून यादरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहिल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  याकाळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, त्यापैकी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही विभागानं नमूद केली आहे.

July 10, 2024 3:16 PM

views 57

ईशान्य आणि पूर्व भारतात दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस

ईशान्य आणि पूर्व भारतात पुढच्या दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि केरळमध्ये पुढच्या चार दिवसात मुसळधार पाऊस पडेल. तर पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार पावसाची स्थिती कायम राहील. उत्तर आणि मध्य भारतात मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू, हरियाणा आणि पंजाबमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस अति मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आह...

July 6, 2024 11:30 AM

views 53

देशाच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्य भागात उद्यापर्यंत तर पंजाब आणि वायव्य भारतात आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.   पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील 5 दिवस वादळ आणि गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कर्नाटकच्या किनारी भागातही काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

July 5, 2024 2:55 PM

views 51

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात बहुतांश ठिकाणी येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, हिमाचल, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश तसंच छत्तीसगढ मध्येही पुढील तीन चार दिवसात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज विभागानं दिला आहे.महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

July 2, 2024 1:13 PM

views 67

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा  अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

June 30, 2024 1:56 PM

views 58

महाराष्ट्रासह गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या काही भागात पुढच्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू च्या काही भागात पुढल्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

June 28, 2024 11:54 AM

views 59

नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल सुरू

नैऋत्य मोसमी पावसाने उत्तरेकडे वाटचाल सुरू केली आहे. संपूर्ण अरबी समुद्र, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट बाल्टिस्तानचा बहुतांश भाग, पंजाब, पूर्व उत्तरप्रदेशच्या काही भागात मान्सूनची आगेकूच झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात काल सकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

June 25, 2024 8:25 PM

views 74

देशात काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम बंगालच्या, हिमालयाकडच्या भागांत, आणि सिक्कीममध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातल्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती राहील, तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढचे पाच ते सहा दिवस हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.   पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि रा...

June 24, 2024 3:04 PM

views 64

देशाच्या दक्षिण भागात पुढचे ५ दिवस अतिजोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

देशाच्या दक्षिण भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राचा पुढचा भाग, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमध्ये पुढे सरकला आहे आणि पुढच्या काही दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि अंदमान-निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशात पुढचे पाच दिवस विजांचा कडकडाट ...

June 23, 2024 7:46 PM

views 83

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे,   वाशिम शहर तसंच जिल्ह्यात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.   नाशिक जिल्ह्यात आज दिवसभर पावसानं चांगली हजेरी लावली. बऱ्याच दिवसां...