May 5, 2025 3:54 PM

views 116

वेव्हज परिषदेच्यानिमित्त धाराशीवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

मुंबईत नुकत्याच झालेल्या वेव्हज - २०२५ या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्तानं लोकसंस्कृती आणि लोककलेची सांगड घालण्यासाठी जिल्हास्तरावर विविध  कार्यक्रम होत आहेत. धाराशिव इथं सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  आणि आकाशवाणीचे वार्ताहर देविदास पाठक या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात सहभागी झाले होते.  

May 5, 2025 9:30 AM

views 94

वेव्ह्ज परिषदेचा मुंबईत काल समारोप

गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या WAVES अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा काल समारोप झाला. देशवासियांच्या उदंड प्रतिसादामुळं या परिषदेचं रूपांतर एका महालाटेत झाल्याचं मत माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं.   पहिल्यावहिल्या WAVES ला या क्षेत्रातल्या विविध लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. WAVES चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या WAVES Bazaar मध्ये या चार दिवसांमध्ये 1 हजार 300 कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. WAVESX च्या माध...

May 4, 2025 7:05 PM

views 97

‘वेव्हज’ परिषदेचा आज समारोप

मुंबईत गेल्या ४ दिवसांपासून  सुरू असलेल्या वेव्हज परिषदेचा आज समारोप झाला. वेव्हज् बाजार मध्ये १ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. WAVESX च्या माध्यमातून १५- १६ स्टार्टअपची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे आणि यातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्य सरकारने या परिषदेत सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे करार केले. त्यामुळे परिषदेच्या आयोजनाबद्दल माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी समाधान व्यक्त केले.    अखेरच्या दिवशी हजारो लोकांनी वेव्हज मध्ये सुरू असलेल्या प्र...

May 4, 2025 3:20 PM

views 94

वेव्हज परिषदेचा आज समारोप

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्हज अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन परिषदेचा आज समारोप होत आहे. चित्रपट निर्मिती या विषयावर सत्रं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ९० हून अधिक देशांतले दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

May 4, 2025 1:42 PM

views 109

WavesX १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा

वेव्हज परिषदेतला स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रॅम वेव्हजएक्स सुमारे १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा असल्याचं IAMAI चे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंग्रान यांनी म्हटलं आहे. विविध स्टार्टअप्सनी वेव्हजसाठी एकूण एक हजार अर्ज सादर केले होते. त्यापैकी सुमारे ३० स्टार्टअप्सनी वेव्हजमधल्या गुंतवणूकदारांसमोर त्यांचे विचार मांडले आहेत. वेव्हजच्या स्टार्टअप पॅव्हेलियनमध्ये सुमारे ११० स्टार्टअप्सनी त्यांचे विचार मांडले आहेत. त्यांना काही निधी मिळण्याची अपेक्षा आहे. स्टार्टअप गुंतवणूकदार र...

May 3, 2025 8:01 PM

views 79

वेव्हज् बाजारमधे गेल्या २ दिवसात 1 हजार कोटीपेक्षा जास्त व्यवसाय संधी खुल्या

वेव्हज् २०२५ च्या मंचावर वेव्हज् बाजारमधे गेल्या २ दिवसात एक हजार कोटी पेक्षा जास्त व्यवसाय संधी खुल्या केल्या आहेत. कालच्या दिवसात अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाली तर आज दिवसभरात आठशे कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शक्यता आहे. माहिती आणि प्रसारण विभागाचे संयुक्त सचिव पृथुल कुमार यांनी सांगितलं की वेव्हज् २०२५ हा उपक्रम कल्पनेपलिकडे यशस्वी झाला आहे.   दीड हजारापेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी वेव्हज बाजार पोर्टलवर झाली असून त्यात ८ हजार खरेदीदार तर ४ हजार विक्रेते आहेत. अॅमेझॉन प्राईम व्हिडि...

May 3, 2025 7:09 PM

views 122

कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरु असलेल्या कार्याची डॉक्टर एल मुरुगन यांच्याकडून प्रशंसा

कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरु असलेल्या कार्याची, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते आज वेव्हज् परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उदघाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत आहे असं ते म्हणाले.   दहाव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी झालं. नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरळा वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिल...

May 3, 2025 7:03 PM

views 65

वेव्हज् परिषदेत इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी – अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पेरिटिव्ह या श्वेतपत्रिकेचं अनावरण

मुंबईत भरलेल्या वेव्हज् परिषदेत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आज इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी - अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पेरिटिव्ह या श्वेतपत्रिकेचं अनावरण केलं. या श्वेत पत्रिकेत भारतातल्या वेगाने विस्तारणाऱ्या लाईव्ह या प्रकारच्या मनोरंजन उद्योगाचं व्यापक विश्लेषण देण्यात आलं आहे.   या विश्लेषणात मनोरंजन क्षेत्रातले उदयोन्मुख प्रवाह, मनोरंजन क्षेत्राच्या वाढीसाठीचे पर्याय तसंच, सातत्याने उत्क्रांतीसाठी धोरणात्मक शिफारसींचा समावेश आहे. भारताच्या लाईव्ह इवेंट्स विभागाचा ...

May 3, 2025 6:29 PM

views 74

वेव्हज् बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती- संजय जाजू

वेव्ह्ज बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी वेव्ह्ज बाजारनं महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं.   या क्षेत्रातले व्यावसायिक संपर्क, सहयोग आणि नवनवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने हा समर्पित मंच ठरल्याचं जाजू यांनी म्हटलं आहे. उच्च श्रेणीतल्या कंपन्या वेव्ह्ज बाजारमध्ये सहभागी होत असल्याचं...

May 2, 2025 9:16 PM

views 176

WAVES 2025 : वेव्हज बाजाराचा पहिल्या दीड दिवसात २५४ कोटी रुपयांचा व्यवसाय

वेव्हज परिषदेत वेव्हज् बाजारने पहिल्या दीड दिवसात चित्रपट, संगीत, ऍनिमेशन, व्हीएफएक्स आदी क्षेत्रात २५४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.  पुढल्या दोन दिवसात यात आणखी भर पडेल, असं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.   वेव्हज बाजारमधल्या खिडकी गाँव या प्रकल्पाने एशियन सिनेमा फंडशी व्हीएफएक्स करार केला. या प्रकल्पाचं मूल्य दोन कोटी रुपये आहे. जागतिक प्रेक्षकांसाठी कंटेट निर्मिती करण्याच्या उद्देशानं सध्या ओएमएल आणि गॅझप्रॉम मीडिया यांच्यात करार होणार आहे....