December 28, 2025 7:15 PM

views 115

  पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी

  मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून  उभारण्यात आलेल्या या  बंधाऱ्यामुळं पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे.   त्यामुळं  भूजल पातळी वाढून स्थानिक शेतीसाठी  पुरेसा जलसाठा निर्माण होणार आहे.  मातीची धूप रोखण्यासाठी तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही या बंधाऱ्याचा लाभ होणार आहे.